Suresh Dhas : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जो कोणी चुकीचं वागेल, गद्दारी करेल त्याचा कडेलोट केला जात होता. त्या काळात जर हगवणे कुटुंब असते तर छत्रपती शिवरायांनी त्यांचा कडेलोट केला असता, असं वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केलं आहे. आताच्या काळात अशा लोकांना संरक्षण मिळते आहे, अशी खंत देखील आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली.
बीडच्या आष्टी तालुक्यातील जामगाव येथे शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार सुरेश धस बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभर संपन्न होत आहे. राज्याच्या विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आज किल्ले रायगड वर देखील मोठा सोहळा पार पडतोय. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आज राज्यातील तीन ते चार लाख शिवभक्त गडावर दाखल झालेत. छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. याचा उत्साह गडावर पाहायला मिळतोय.
वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी केली होती आत्महत्या
वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी सासरकडून होणाऱ्या हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात समोर आलेल्या अनेक धक्कादायक खुलास्यांनंतर हगवणे कुटुंबाला पोलिसांनी अटक केली. वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी देखील हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केलेले आहे. वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात समोर आलेल्या माहितीनंतर आता वैष्णवीने गळफास घेतलेल्या पंख्याची देखील फॉरेन्सिक तपासणी होणार असल्याचं समोर आलं आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी वैष्णवी हगवणेने आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचललं. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने टोकाचा निर्णय घेत स्वतःला संपवलं. सध्या वैष्णवी प्रकरण सर्वत्र चर्चेत आलं आहे. दरम्यान, वैष्णवी हगवणेच्या मृत्यूला जबाबदार असणारे आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे तिच्या मृत्यूनंतर तब्बल सात दिवस फरार होते, मात्र पोलिसांना सापळा रचून त्यांच्या मुसक्या बांधण्यात त्यांना यश आले आहे. दरम्यान, सासरच्या छळाबाबत दोन्ही सूनांनी तक्रारही केली होती मात्र त्यांचे सासरे राजेंद्र हगवणे यांचे राजकीय क्षेत्रात कनेक्शन असल्याने त्यांना योग्य तो न्याय मिळाला नाही.
महत्वाच्या बातम्या: