Sunil Shetty : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  सुनील शेट्टी (Suniel Shetty)  ही सध्या त्याच्या ट्वीटरवरील वक्तव्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एका नेटकऱ्यानं  तंबाखूच्या जाहिरातीचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) हे दिसत आहेत. त्या युझरनं या जाहिरातीचा फोटो शेअर करुन अजयला टॅग करण्याऐवजी सुनीलला टॅग केले. नंतर सुनीलनं त्याला खडे बोल सुनावले. या सर्व प्रकरणामुळे त्या नेटकऱ्याला सुनीलची माफी मागावी लागली. आता एका कार्यक्रमामध्ये या प्रकराणाबद्दल सुनीलनं भाष्य केलं. 


मुंबईनमधील जुहू येथील एका इव्हेंटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये सुनीलनं त्या नेटकऱ्याच्या ट्वीटबाबत सांगितलं. तो म्हणाला,  'तंबाखू लोक खरेदी करतात म्हणून त्याची जाहिरात केली जाते. पण मी कधीच  तंबाखू खाल्ली नाही. मी बऱ्याच गोष्टींपासून दूर राहतो. पण याचा अर्थ असा नाही की मी देव आहे किंवा संत आहे. माझ्यामध्ये देखील काही वाईट गुणं आहेत. त्या व्यक्तीनं मला टॅग केलं आणि तो म्हणाला की तुम्ही भारतामध्ये कॅन्सर पसरवत आहात. म्हणून मी त्याला म्हणालो तुझा चष्मा बदल. कारण त्या जाहिरातीमध्ये मी नव्हतो. '


काही दिवसांपूर्वी एका नेटकऱ्यानं तंबाखूच्या जाहिरातीचा फोटो शेअर केला होता. त्यानं  फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'एवढ्या जाहिराती पाहून हायवेवर आता गुटखा खाण्याची इच्छा निर्माण होत आहे. ' पुढे त्या नेटकऱ्यानं सुनील शेट्टीला टॅग करुन लिहिले, 'अरे, गुटखा किंग ऑफ इंडिया शाहरुख, अक्षय आणि सुनील तुम्ही देशाला कॅन्सरचा देश बनवत आहात.' नेटकऱ्याच्या या ट्वीटला रिप्लाय करुन सुनील म्हणाला, 'भाई तू तुझा चष्मा अॅडजेस्ट कर किंवा बदल. '


नेटकऱ्यानं मागितली होती माफी 
'हॅलो सुनील. सॉरी मला अजय देवगणला टॅग करायचं होतं पण तुझं नाव चुकून टॅग केलं. मी तुझा फॅन आहे त्यामुळे तुझं नावं पहिलं आलं' 


हेही वाचा :