Sumeet Raghavan :  मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी मालिकांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेता सुमीत राघवन (Sumeet Raghavan ) हा सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करतो. सुमित त्याच्या पोस्टमधून वेगवेगळ्या विषयांवर त्याची मतं मांडतो. सध्या सुमितची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट  सुमीतनं शेअर केल्या नंतर अनेकांनी या पोस्टला कमेंट्स आणि लाइक्स केल्या आहे. 


सुमीतची पोस्ट
सुमीतनं एक व्हिडीओ शेअर केला आहे.  या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिले, 'मेट्रो कारशेड तुम्ही स्थलांतरित केली. पण दहिसर टोल नाका,  पश्चिम द्रुतगती मार्गावरील बेकायदेशीर दुकाने हलवण्यात आली नाहीत. असंच सुरू राहिलं तर मुंबईकर मुंबईबाहेर स्थलांतरित होतील आणि तुम्ही या अतिक्रमण असलेल्या शहरात शांततापूर्ण जीवन जगू शकाल.' सुमीत राघवननं ही पोस्ट शेअर करून मुंबई महानगरपालिकेच्या पेजला टॅग केले आहे. 


व्हिडीओमध्ये  सुमीत म्हणतो, 'अनधिकृत दुकानं असणाऱ्या या लोकांना मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी कशी मिळते हे मला जाणून घ्यायचंय. कारण माझ्या मते तीन दिवसांपूर्वी ही अनधिकृत दुकानं हटवण्यात आली होती. पण पुन्हा ही लोकं इथे आली आहेत.  मुंबई महानगरपालिकेला मी विनंती करतो  की ही समस्या तुम्ही लवकर सोडवावी.'






सुमीतच्या ‘वागळे की दुनिया’या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आपला माणूस, ...आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर, संदूक या चित्रपटांमध्ये  सुमीतनं प्रमुख भूमिका साकारली आहे.


महत्वाच्या बातम्या