मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बॉलिवूडच्या हॉट कपल्सपैकी एक. गेल्या अनेक दिवसांपासून दोघेही लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. परंतु, अद्यार दोघांचं लग्न झालेलं नाही. त्यामुळे रणबीर-आलियाच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्येही कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. रणबीर-आलियाचं लग्न बॉलिवूडमधील मोस्ट अवेटेड वेडिंग्सपैकी एक आहे. अशातच आता रणबीर-आलिया यांच्या लग्नाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे एक अभिनेता चर्चेत आला आहे. बऱ्याचदा आपल्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्याच असणारा अभिनेता केकेआरनं या दोघांच्या लग्नाबाबत ट्वीट केलं आहे. याच ट्वीटमुळं नेटकऱ्यांनी केकेआरवर टीकेची झोड उठवली आहे. 


आलियाला सोडणार रणबीर 


केकेआर म्हणजेच, कमाल आर खाननं ट्वीट करत दावा केला आहे की, रणबीर कपूर आणि आलियाचं लग्न 2020 पर्यंत होईल आणि लग्नाच्या 15 वर्षांनी दोघांचा घटस्फोट होईल.



नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड 


केआरकेनं केलेल्या या ट्वीटवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींनी तर केकेआरवर टीकेची झोड उठवली आहे. रणबीर-आलियाच्या चाहत्यांनी केकेआरला चांगलंच फैलावर घेतलं आहे. एका युजरनं केकेआरला उत्तर देताना म्हटलं आहे की, "देवा... तुम्ही महान आहात, सकाळी-सकाळी एवढं वाईट तुम्ही कसे बोलू शकता?". अशातच आणखी एका व्यक्तीनं त्यांना 'स्वस्त नेस्त्रोदमस' म्हटलं आहे. एका चाहत्यानं तर तुम्ही तुमच्यासोबत घडलेला प्रसंग तर सांगत नाही ना? असा प्रश्नच केआरकेला विचारला आहे. 




प्रियंका आणि निक जोनास यांच्याबाबतही केलं होतं ट्वीट 


नेटकऱ्यांच्या टीकेचं धनी होण्याची केआरके यांची ही पहिली वेळ नसून यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त ट्वीटमुळे नेटकऱ्यांनी केआरकेला फैलावर घेतलं आहे. यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्याबाबतही केआरकेनं ट्वीट केलं होतं. त्या ट्वीचमध्येही केआरकेनं प्रियंका आणि निकचा घटस्फोट लग्नानंतरच्या 15 वर्षांच्या आत होणार असल्याची भविष्यवाणी केली होती. 


दरम्यान, आलिया आणि रणबीर गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांच्या नात्याला दोन्ही कुटुंबियांकडूनही परवानगी मिळाली आहे. आलिया अनेकदा रणबीरच्या घरातील कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसून येते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूडमधील चर्चेत असणारं हे कपल गेल्याच वर्षी लग्नगाठ बांधणार होतं. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोघांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं. रणबीर आलिया करण जोहरचा आगामी चित्रपट ब्रम्हास्त्रमध्ये दिसून येणार आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :