मुंबई : शंकर महादेवन हे नाव आपल्याला नवं नाही. एक गायक म्हणून ते परिचित आहेतच. पण त्याही पलिकडे शंकर, एहसान, लॉय या तिघांनी हिंदी सिनेसृष्टीत एकापेक्षा एक गाणी दिली. केवळ हिंदीच नव्हे, तर कट्यार काळजात घुसलीसारख्या चित्रपटातून हे त्रिकूट मराठीत अवतरलं. शंकर महादेवन यांचा प्रवास मोठा आहे. शंकर महादेवन यांनी मराठीसोबतही आपली नाळ टिकवून ठेवली आहे. त्यांच्या विविध भाषांमधला प्रवास आता एका माहीतीपटामध्ये बंदिस्त झाला आहे. त्याच माहीतीपटाला टोरांटो इंटरनॅशनल वुमन्स फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटाचं पारितोषिक लाभलं आहे. 


शंकर महादेवन यांच्यावर बायोग्राफी बनली आहे. एका माहितीपटाद्वारे शंकर यांचं जगणं पडद्यावर मांडण्यात आलं आहे. त्या माहितीपटाचं नाव आहे, डिकोडिंग शंकर. या माहितीपटाचं दिग्दर्शन केलं आहे दिप्ती सिवन यांनी. या माहितीपटाला टोरांटो वुमन्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये डॉक्युमेंटरी सेगमेंटमध्ये बेस्ट फिल्मचं पारितोषिक मिळालं आहे. शंकर महादेवन याबद्दल बोलताना म्हणाले, माझी बायोग्राफी कधी होईल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण दिप्ती सिवन यांच्या दिग्दर्शनाखाली ती झाली. इतकंच नव्हे तर त्याला पारितोषिकही मिळालं. ही बायोग्राफी पाहताना माझ्या लक्षात आलं की, माझ्या आयुष्यात गाण्यामुळे, संगीतामुळे मला पैसे मिळाले आहेतच. पण माझ्या गुडविलमुळेही मला अर्थप्राप्ती झाली. इतकंच नव्हे तर त्यामुळेच मी या लॉकडाऊन काळात काम करू शकलो. 


शंकर यांनी या लॉकडाऊन काळात संगीतकारांवर, कलाकारांवर ओढवलेल्या परिस्थितीवर बोलताना सांगितलं की, "या लॉकडाऊनमुळे लोककला कलारांवर फार कठीण परिस्थिती ओढवली. शिवाय, ऑर्केस्ट्रात गाणारे कलााकार.. छोटछोटे कार्यक्रम करणारे कलाकार यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला. ही परिस्थिती लवकरच निवळेल आणि यातून कााहीतरी चांगलं निष्पन्न होईल, असा विश्वास मला वाटतो." शंकर महादेवन आपल्या या बायोपिकबद्दल बोलताना म्हणले की, "मला विश्वास बसत नव्हता की, आपण इतक्या वेगवेगळ्या स्तारतून काम करून पुढे आलो आहोत. आज आम्ही अशा क्लासमध्ये काम करतो की, लॉकडाऊनमध्ये आमचा निभाव लागू शकला. पण मी मघाशी म्हटलं त्याप्रमाणे इतरांची अवस्था फार बिकट आहे. त्याबद्दल मला वाईट वाटतं. देवळात गाणारे कलाकार... वाद्य वाजवणारे कलाकार... यांच्यावरची परिस्थिती कठीण आहे. हा काळ लवकर सरो आणि यातून चांगलं घडो.", असंही महादेवन म्हणतात. 


शंकर महादेवन हे मराठी कानसेनांना चांगलेच माहीत आहेत. मन उधाण वाऱ्याचे, विश्वविनायक, मितवा, सूर निरागस हो... यांसारखी अनेक श्रवणीय गाणी त्यांनी दिली. श्रीनिवास खळे यांच्यापासून अजय अतुलपर्यंत त्यांच्या असलेला स्नेह सर्वांना परिचित आहे. त्यांचा माहितीपट आता चंदेरी पडद्यावर चितारला गेला आहे. त्याला टोरांटो सारख्या नावाजलेल्या फिल्म फेस्टिवलमध्ये पारितोषिक मिळाल्याने एका अर्थाने या गुणसंपन्न गायक कलाकाराचाच तो गौरव झाला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :