Sukh Mhanje Nakki Kay Asta :  स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेत सध्या बरीच उलथापालथ पाहायला मिळतेय. नुकतीच मालिकेत नव्या गौरीची एण्ट्री झाली आहे. घरात आल्यावर आता गौरीने आपला ठसका दाखवायला सुरुवात केली आहे. मानसी आणि जयदीप यांनी मिळून गौरीला संपवण्याचा कट रचला होता. मात्र, यातून बचावलेली गौरी आता या सगळ्यांचा डाव उघडकीस आणणार आहे.


मानसीसोबत प्लॅन बनवून जयदीपने गौरीला कड्यावरून ढकलून दिले होते. त्याने गौरीला कड्यावरून ढकलून दिल्यानंतर तिने या जगाचा निरोप घेतला, असे वाटले. पण, आता गौरी सारख्या दिसणाऱ्या मुलीची एण्ट्री या मालिकेत झाली आहे. मालिकेतील गौरी ही साधीभोळी असली तरी ही आलेली पाहुणी मात्र अरे ला कारे करणारी आहे. ही मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून, स्वतः गौरीच आहे. नवा रांगडा अवतार घेऊन ती आता बदला घेण्यासाठी या घरात परतली आहे.


 


पहिल्याच दिवशी गौरी दाखवणार इंगा!


मालिकेतील गौरी ही साधीभोळी असली, तरी ही नवी गौरी मात्र अरे ला कारे करणारी आहे. पहिल्याच दिवशी ती शालिनी वहिनी आणि मानसीला चांगलाच धडा शिकवणार आहे. पहिल्याच दिवशी गौरीने शालिनी, जयदीप आणि मानसी यांना धमकी दिली आहे. यामुळे आता तिघांचेही धाबे दणाणले आहेत.


गौरी माईंना सांगणार सत्य


गौरीने घरात तर प्रवेश केला आहे. मात्र, तिच्या या बदललेल्या वागणुकीमुळे माई दुखावल्या गेल्या आहेत. यानंतर आता गौरी माईंना सगळी सत्य परिस्थिती सांगणार आहे. मानसी आणि जयदीपने मिळून कसं आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि आपली स्मृती गेलेली नसून, केवळ या दोघांच्या या कृत्याचा पर्दाफाश करण्यासाठी आपण हे सोंग करत असल्याची कबुली गौरी माईंना देणार आहे.


'सुख म्हणजे नक्की काय असतं'  या मालिकेत गिरिजा प्रभू, मंदार जाधव, मीनाक्षी राठोड, माधवी निमकर आणि वर्षा उसगांवकर हे कालकार प्रमुख भूमिका साकरतात. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha