Lok Kay Mhantil Marathi Movie : ‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी!’ या बहुचर्चित चित्रपटानंतर दिग्दर्शक सुश्रुत भागवत आणि ‘उदाहरणार्थ निर्मित’ पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. ‘लोक काय म्हणतील?’ (Lok Kay Mhantil) या नावाच्या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर पोस्टर लाँच करून करण्यात आली आहे.
‘उदाहरणार्थ निर्मित’ संस्थेच्या अंतर्गत ‘लोक काय म्हणतील?’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या निर्मिती संस्थेनं या पूर्वी ‘चिडिया’, ‘कागर’ अशा उत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच, सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पन्नासहून अधिक पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे. देहदान आणि त्याविषयाची जागृती करणारा हा चित्रपट आहे.
‘8 दोन 75’ची हवा!
सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायांकन, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन, सर्वोत्कृष्ट निर्मिती व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट निर्माता आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा सर्व विभागात सिनेमाने पुरस्कार पटकावले आहेत. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे-विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ.निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.
‘लोक काय म्हणतील?’ या चित्रपटाविषयी कुतुहल
सुश्रुत यांनी ‘मुंबई टाइम’, ‘पेईंग घोस्ट’, ‘असेही एकदा व्हावे’ असे उत्तम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘लोक काय म्हणतील?’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सुश्रुत भागवत करणार आहेत, तर सुश्रुत आणि शर्वाणी पिल्ले यांनी कथा व पटकथा लेखन केलं आहे.
चित्रपटांतील कलाकार, चित्रपटाचा विषय आदी तपशील टप्प्याटप्प्यानं जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांतून सुश्रुत यांनी उत्तम विषयांची तितकीच सकस मांडणी केली असल्यानं ‘लोक काय म्हणतील?’ या चित्रपटाविषयी कुतुहल आहे.
संबंधित बातम्या
- Jhund Box Office Collection Day 2 : ‘झुंड’ची यशस्वी घौडदौड सुरूच! दुसऱ्या दिवशीही गाठला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा!
- Bhuban Badyakar : ‘कच्चा बदाम’नंतर नवा कारनामा, स्वतःच्याच अपघातावर भुवन बड्याकरने तयार केलं गाणं!
- Rohit Shetty : ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या स्पर्धकाने जिंकलं रोहित शेट्टीचं मन! मिळवली आगामी चित्रपटात संगीत देण्याची संधी!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha