Sukesh Chandrashekhar : मनी लाँड्रींग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) हा सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगतोय. सुकेशने हजारहून अधिक लोकांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सुकेश हा बॉलिवूड अभिनेत्रींना आलिशान भेटवस्तू देत असल्यामुळेही बराच चर्चेत आला होता. त्यातच आता सुकेशने जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) तुरुंगातून पत्र लिहिलंय. इतकच नव्हे तर त्याने त्यांच्या प्रेमाला रामायणाची उपमा दिलीये.
फ्री प्रेस जर्नलरने याविषयी वृत्त दिले आहे. सुकेशने तिहार जेलमधून जॅकलीनसाठी पत्र लिहिलं असल्याचं सांगण्यात येत आहे. आधीच्या एका पत्रात सुकेशने जॅकलीनच्या चाहत्यांनाच 200 महिंद्रा थार कार आणि आयफोन 16 प्रो मॅक्स गिफ्ट म्हणून देणार असल्याचं सांगितलं होतं. या गिफ्टविषयीही त्याने या पत्रात उल्लेख केलाय. इतकच नव्हे तर या गिफ्टची अंतिम तारीखही त्याने सांगितली आहे.
सुकेशचं जॅकलीनला पत्र
सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला पत्र लिहित म्हटलं की, श्रीराम जसा सीतेसोबतच वनवासातून परतला होता, त्याचप्रमाणे माझी सीता जॅकलनीनसाठी मी देखील या छोट्या वनवासातून परतणार आहे. आमच्यामध्ये काय आहे, याची कल्पना जगाला नाही.. आमची प्रेमकहाणी काल,आज आणि उद्याही एक आदर्शच ठरणार आहे आणि आमच्यासारख्या वेड्यांना जग कायमच लक्षात ठेवेल. चाहत्यांना त्यांच गिफ्ट मिळण्याची अंतिम मुदत ही 25 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आलीये. याच पत्राचा शेवटी सुकेशने जॅकलीनचा असं लिहिलं आहे.
सुकेशने जॅकलीनला गिफ्ट म्हणून दिली बरीच जनावरं
सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीने एकूण 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलं. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे आणि ही सगळी माहिती, ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये देण्यात आली.
ही बातमी वाचा :
Salman Khan : सलमान खानला धमकी देणारा एक आरोपी अटकेत, वांद्र्यातून मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात