India vs New Zealand 3rd Test : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिले दोन सामने जिंकून न्यूझीलंडने मालिकेत दोन शून्याने कब्जा केला आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या कसोटीबाबत टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक जॉन राईट म्हणाले की, विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांसारख्या खेळाडूंसाठी ही शेवटची घरची कसोटी असू शकते.
जॉन राइट एक्सवर पोस्ट करून रोहित, विराट, जडेजा आणि अश्विनबद्दल बोलले. या सर्व महान खेळाडूंसाठी मुंबईत एकत्र खेळली जाणारी कसोटी ही शेवटची मायदेशातील कसोटी ठरू शकते, असे म्हणाले. राईटची पोस्ट एक गोष्ट स्पष्ट करत आहे की, न्यूझीलंडविरुद्ध मुंबईत होणाऱ्या कसोटीनंतर काही वरिष्ठ खेळाडूंना टीम इंडियातून वगळले जाऊ शकतात.
2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावण्यापूर्वी भारतीय संघाने 2012 मध्ये घरच्या मैदानावर शेवटची कसोटी मालिका गमावली होती. 2012 ते 2024 पर्यंत टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग 18 कसोटी मालिका जिंकल्या. आता टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध मुंबईत होणारा तिसरा कसोटी सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे. मालिका गमावल्यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणे कठीण दिसत आहे.
या मालिकेत विराट कोहलीला आतापर्यंत 4 डावात केवळ 88 धावा करता आल्या आहेत. या काळात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 70 धावा होती. त्याची सरासरी फक्त 22.00 आहे. त्याच वेळी, रोहित शर्माला 2 सामन्यांच्या 4 डावात केवळ 62 धावा करता आल्या आहेत. या कालावधीत त्याने 1 अर्धशतक झळकावले असून त्याची सरासरी केवळ 15.50 आहे. यापूर्वी टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामनेही खेळले आहेत. त्यावेळीही या खेळाडूंच्या बॅटमधून एकही मोठी खेळी दिसली नाही.
हे ही वाचा -
Ind vs Nz 3rd Test : फक्त अफवा! मुंबई कसोटीत 'हा' खेळाडू खेळणार नाही, कोचने केला खुलासा