मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ड्रग्ज कनेक्शनबाबत तपास करत आहे. आज रियाची या प्रकरणी एनसीबी चौकशी करत आहे. दुसरीकडे रियाचे वकील सतिश मानेशिंदे यांनी रिया अटकेसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार आहे. एखाद्यावर प्रेम करणे हा गुन्हा असेल तर रिया त्याचे परिणाम भोगायला तयार आहे. रिया निर्दोष आहे म्हणून तिने सीबीआय, ईडी, एनसीबी, बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या केस मध्ये अटकपूर्व जामिनासाठी कोर्टाकडे धाव घेतली नाही, असं सतिश मानेशिंदे यांनी म्हटलं आहे.





NCB कार्यालयात रियाची चौकशी सुरु
माहितीनुसार सध्या एनसीबीच्या कार्यालयात रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे. NCBचे तीन अधिकारी तिची चौकशी करत आहेत. यामुळं एनसीबीचं संपूर्ण कार्यालय बंद केलं आहे. परिसरात तगडी बॅरिकेडिंग केली आहे. तसंच एनसीबी ऑफिसकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.


मी अडकले तर तुम्हाला सगळ्यांना अडकवेन, रियाची आपल्या गॉड फादरला धमकी


 शौविक आणि सॅम्युअल मिरांडाला एनसीबीकडून अटक 


परवा सकाळीच एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या घरी धाड टाकत घराची झाडाझडती घेतली होती. त्यावेळी रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. रात्री जवळपास 10 वाजता शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना एनसीबीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर आज एनसीबीच्या टीमनं सकाळी रियाच्या घरी जाऊन रियाला समन्स बजावला. त्यानंतर रिया चक्रवर्ती चौकशीसाठी NCB कार्यालयात पोहोचली.



सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये जेव्हा ड्रग्सचा अॅंगल समोर आला होता तेव्हा त्याचे धागे रिया चक्रवर्तीशी कुठेतरी जोडलेले आहेत का? असा सवाल उपस्थित केला गेला आणि आता याच प्रकरणात रिया चक्रवर्ती वर अटक होण्याची नामुष्की आली आहे. आधी रियाचा भाऊ शौविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर आणि रिया चक्रवर्ती जवळचा मित्रा सॅम्युअल मिरांडा यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक करून 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कस्टडी देण्यात आली आहे. NCBच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या प्रकरणांमध्ये आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांनुसार यांचा संबंध समोर आला आहे.


SSR Case | ड्रग्जप्रकरणी शौविक आणि मिरांडाला अटक, रिया ड्रग्ज मागवत असल्याची कबुली


ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास केला जात होता. याच तपासादरम्यान रिया आणि शौविकच्या मोबाईलची तपासणी केल्यावर ईडीला ड्रग्स संदर्भातले चॅट सापडले जे डिलीट करण्यात आले होते आणि हे चॅट सापडल्यानंतर या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एन्ट्री झाली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो डेप्युटी डायरेक्टर जैन यांनी आत्तापर्यंतच्या नार्कोटिक्स ब्युरोच्या कारवाईवर बोलत या प्रकरणांमध्ये अजून तपास करून रियाला आतापर्यंत चौकशीसाठी समन्स बजावले नाही आहे तसेच लवकरात लवकर तिला चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे, असं काल सांगितलं होतं.


रिया चक्रवर्तीवर ड्रग्सचं सेवन करणे, ड्रग्सची वाहतूक करणे आणि शौविकच्या माध्यमातून ड्रग्स मागवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. या प्रकरणामध्ये आतापर्यंत सात लोकांना अटक करण्यात आली आहे. यात अप्पा लखानी आणि करण अरोडा यांना जामीनही मिळाला आहे. तर जैद विलात्रा आणि बासित परिहार, शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा यांना 9 सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.


यात रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली तर ही आतापर्यंतची या प्रकरणांमध्ये सगळ्यात मोठी अटक असणार आहे. तसंच यात बॉलिवूडमधील अजून काही बड्या व्यक्तींची नावं समोर येण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या :