मुंबई : सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात एनसीबी सहभागी झालं आणि या सगळ्या प्रकरणात अमली पदार्थाचा झालेला सुळसुळाट अनेकांना दिसला. नार्कोटिक्स कमिशन ब्युरोने आता या प्रकरणात रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्तीला अटक केली आहे. शौविकनेच रिया ड्रगबाबत सांगायची असा कबुलीजबाब दिला आहे. आता पुढची स्टेप रियाच्या अटकेपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही बाब दिसू लागल्यावर मात्र रियाने आपला हुकमी एक्का बाहेर काढत आपल्या 'गॉडफादर' पर्यंत एक मेसेज पोहोचवला आहे.


रिया चक्रवर्तीवर आता एनसीबीचं लक्ष आहे. शौविकला अटक झाल्यानंतर काही काळात रियालाही अटक होईल अशी शक्यता वर्तवली जातेय. त्याचवेळी रियानेही आता आपली हालचाल सुरू केली आहे. रियाला अटक करवून घ्यायची नाहीय. म्हणून तिने आपल्या गॉडफादरला मेसेज दिला आहे. हा मेसेज दिला आहे स्मिता पारेखने. स्मिता पारीख ही सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी झटणारी कार्यकर्ती आहे. जस्टिस फॉर सुशांतची जागा आता जस्टिस फॉर मीने घेतली आहे. स्मिता पारीख मध्ये आणि रियामध्ये व्हॉट्सएप चॅट होत असून, रियाने तिच्याकरवी मेसेज दिला आहे.


SSR Case | ड्रग्ज प्रकरणात मुंबईत एनसीबीचं धाडसत्र, रियाच्या घराची झडती, सॅम्युअल मिरांडाच्या घरीही पथक


मला अटक झाली तर मी तर अडकेनच पण तुम्हाला सगळ्यांना मी अडकवेन असा इशारा तिने या आपल्या गॉडफादरला दिला आहे. रियाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. अशावेळी रियाने मेसेज करून आपला हुकमी एक्का बाहेर काढला आहे. शौविक एनसीबीला म्हणाला, ड्रग्ज कधी घ्यायचे. कधी घ्यायचे नाहीत ते रिया सांगायची. त्यावरून रियाचे ड्रग पेडलरशी संबंध होते हे तर उघड आहे. रिया ड्रग पोचवायची हे उघड आहे.


सुशांत ड्रग घ्यायचा की नाही हा मुद्दा वेगळा आहे. पण ती मागवायची हे निश्चित झालं आहे. हे सिद्ध झालं तर रिया 20 वर्षासाठी तुरुंगात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपली अटक जशी जवळ येतेय तशी रियाने हालचाल करायला सुरूवात केली आहे. आपलं रियासोबत बोलणं झालं असं स्मिता पारीख सांगते आहे. यातूनच रियाशी बरीच मोठी कनेक्शन्स जोडली गेलेली आहेत हे उघड होतं आहे. अनेक यू ट्युबर्सनी ही बातमी आपआपल्या चॅनलवरून दिली आहे.