Bollywood Star Struggle: बॉलिवूडचा (Bollywood) सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादी आजही एक नाव दिमाखात सामील केलं जातं, ते म्हणजे, इरफान खान (Irrfan Khan). काही वर्षांपूर्वी हा दिग्गज अभिनेता जग सोडून गेला. पण चाहत्यांच्या मनात आजही त्याची वेगळी जागा असल्याचं पाहायला मिळतं. 29 एप्रिल 2020 रोजी इरफाननं आपल्या सर्वांचा निरोप घेतला आणि या जगातून एग्झिट घेतली. पण चाहत्यांच्या मनात मात्र आजही त्याची जागा कोणी घेऊ शकलेलं नाही.
इरफान खाननं आपल्या कामानं केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडही (Hollywood) गाजवलं. पण तुम्हाला माहितीय का? कधीकाळी हा सुपरस्टार एसी दुरूस्त करून आपलं पोट भरत होता. पण नशीब पालटलं आणि तो बॉलिवूडचा मोठा स्टार म्हणून ओळखला जाऊ लागला.
...जेव्हा इरफान खान सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या घरी AC रिपेअर करण्यासाठी पोहोचला
दिवंगत अभिनेता इरफान खाननं स्वतः एकदा मुलाखतीत बोलताना हा किस्सा सांगितला होता. इरफाननं सांगितलेलं की, तो जयपूरमध्ये टेक्निकल कोर्सची ट्रेनिंग घेत होता आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तो मुंबईला आला होता. त्यानंतर कामचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी त्यांना फिल्डवर पाठवलं गेलं. यादरम्यान, त्यानं मुंबईतील अनेक रस्ते पालथे घातले. अनेक घरांमध्ये जाऊन एसी नीट केला. असंच एकदा एसी रिपेअर करण्यासाठी त्याला बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्या घरी जावं लागलं.
याबद्दल बोलताना इरफाननं सांगितलं होतं की, "मला आठवतं की, कुणीतरी भाई म्हणून होतं, त्यांनी दरवाजा उघडला आणि मला विचारलं की, कोण? मी उत्तर दिलेलं की, एसीवाला... असा मी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या घरी पोहोचलो होतो. दरम्यान, नंतर मी जयपूरला गेलो आणि मला काही काम करायचं होतं, म्हणून माझ्या वडिलांनी माझी कोणाशी तरी ओळख करून दिली आणि मला पंख्याच्या दुकानात कामावर ठेवलं."
क्रिकेटर बनायचं होतं, पण...
आपल्या अभिनयानं कधी डोळ्यांत पाणी आणणारा, तर कधी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा इरफान खानला कधीकाळी क्रिकेटर व्हायचं होतं. यावेळी खूप छान खेळायचा आणि सीके नायडू ट्रॉफीसाठीही त्याची निवड झाली, परंतु त्यानं या स्पर्धेतून माघार घेतली, कारण त्यावेळी त्याच्याकडे प्रवास करण्यासाठी पैसे नव्हते. त्यानंतर क्रिकेट खेळणं इरफानच्या नशिबी कधी आलंच नाही आणि त्यानं दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला.
टीव्ही ते हॉलीवूडचा प्रवास
इरफान खाननं 'सलाम बॉम्बे' चित्रपटातून इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. मग हळूहळू आपल्या नैसर्गिक अभिनयानं त्यांनी लाखो मनं जिंकली. इरफाननं टीव्हीवरही मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. इरफान खाननं 'सलाम बॉम्बे' चित्रपटातून इंडस्ट्रीत प्रवेश केला आणि दूरदर्शनच्या 'श्रीकांत' या मालिकेतून करिअरला सुरुवात केली. यासोबतच इरफाननं हॉलिवूडमध्येही काम केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :