South Cinema : ओटीटीवर सध्या एक चित्रपट जबरदस्त चर्चेत असून धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाची कथा नेमकी 70 मिनिटांनंतर पूर्णपणे बदलून जाते. त्याचा क्लायमॅक्स तर भन्नाटच आहे. ओटीटीवर प्रदर्शित होताच हा चित्रपट प्रेक्षकांचा पहिला पर्याय ठरला आहे. 2025 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ज्यानेही हा चित्रपट पाहिला, त्याने केवळ स्तुतीच केली आहे. विशेष म्हणजे ओटीटीवर दाखल होताच हा चित्रपट टॉप 10 लिस्टमध्ये समाविष्ट झाला आणि पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करू लागला. आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलतो आहोत त्याचे नाव आहे ‘मारीसन’.

Continues below advertisement

‘मारीसन’ हा तमिळ भाषेतील एक दमदार थ्रिलर-ड्रामा चित्रपट आहे. यात फहाद फासिल आणि वडिवेलु मुख्य भूमिकेत दिसतात. या चित्रपटाची कथा चोर दयालनपासून सुरू होते, ज्याची भूमिका फहाद फासिलने केली आहे. त्याचे काम फक्त लोकांना फसवणे आणि चोरी करणे हेच आहे. कथेच्या सुरुवातीला दाखवले आहे की, चोरीच्या आरोपाखाली पोलिस दयालनला पकडतात आणि पुन्हा असे न करण्याची ताकीद देऊन सोडून देतात. मात्र दयालनला चोरीची सवयच असल्याने, तो लगेचच एका बाईक आणि मोबाईलची चोरी करतो.

यानंतर त्याची नजर एका घरावर पडते. तो चोरीच्या इराद्याने घरात शिरतो. आत त्याची भेट वृद्ध वेलायुधमशी (वडिवेलु) होते, ज्याचा एक हात साखळीने बांधलेला असतो. तो दयालनला सांगतो की त्याच्या मुलाने त्याच्याशी असे केले आहे, कारण त्याला विसरण्याचा आजार आहे.

Continues below advertisement

वेलायुधम, दयालनला सांगतो की जर त्याने त्याला घरातून बाहेर पडायला मदत केली तर पैसे देईल. पैशांच्या लालसेपोटी दयालन त्याला मदत करतो. पण एटीएममधून पैसे काढताना त्याला समजते की वेलायुधमच्या खात्यात तब्बल 25 लाख रुपये आहेत. तेव्हापासून दयालन त्याच्या मागे लागतो. सुरुवातीला मारीसनची कथा अगदी साधी वाटते. पण 70 मिनिटांनंतर चित्रपट अचानक पलटी घेतो. असे काही घडते ज्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केलेली नसते, आणि हीच या थरारपटाची खरी ताकद ठरते. तमिळ भाषेतला मारीसन 22 ऑगस्ट 2025 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि काही क्षणांतच लोकांचा आवडता चित्रपट ठरला. फक्त काही तासांतच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आणि अजूनही त्या स्थानावर टिकून आहे.

फहाद फासिल आणि वडिवेलु अभिनित मारीसन चे दिग्दर्शन सुधीश शंकर यांनी केले आहे. रेटिंगच्या बाबतीतही हा चित्रपट अव्वल ठरला आहे. आयएमडीबीवर मारीसनला 10 पैकी 7.5 रेटिंग मिळाली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दक्षिण भारतीय भाषांसह हिंदीमध्येही उपलब्ध आहे.

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Three People Claimed Sridevi Chennai Farm House: श्रीदेवींच्या चेन्नईतल्या फार्म हाऊसवर तिघांचा दावा; बोनी कपूर यांची न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?

Richest Actor Of South: ना अल्लू अर्जुन, ना प्रभास; 'हा' साऊथचा सर्वात श्रीमंत सुपरस्टार, 3572 कोटींचं नेटवर्थ, कमाईच्या बाबतीत बॉलिवूड स्टार्स याच्या आसपासही नाहीत