Chhattisgarh Naxal : संपूर्ण महाराष्ट्र उत्साहात गणेश चतुर्थी साजरी करत असताना गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर कोपरशी परिसरात गडचिरोली पोलिसांचे सी-60 चे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये  (Chhattisgarh Naxal) जोरदार चकमक सुरू आहे. आज (27 ऑगस्ट) पहाटेपासून ही चकमक (Naxal)सुरू असून परिसरात जोरदार पाऊसही सुरू आहे. त्यामुळे सी-60 च्या जवानांसमोरील आव्हान वाढले आहे. मात्र विपरीत परिस्थितीतही गडचिरोली पोलीस नक्षलवाद्यांच्या प्रत्येक हल्ल्याला सडेतोड उत्तर देत आहे.

Continues below advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सी-60 पथकाकडून हे अभियान राबवण्यात आले होते. काही तासानंतर या चकमकीतून पोलिसांना मोठा यश मिळण्याची शक्यता आहे. सध्या गडचिरोली पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु असून अद्याप या कारवाई संदर्भातील तपशील पुढे आला नसला तरी दंडकारण्यात नक्षली सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशीच भामरागडात पुराचे संकट; शंभर पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली : इंद्रावती नदीच्या पाणलोट क्षेत्रात आणि भामरागड लगतच्या छत्तीसगड राज्यातील भागामध्ये कालपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीचे पाणीपातळी मध्ये वाढ झाल्याने पर्लकोट नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी भामरागड शहरात शिरले असून काल रात्रीच भामरागड बाजारपेठेच्या दुकानातील साहित्य प्रशासनाद्वारे आधीच सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पुरामुळे आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्याने गणेश चतुर्थीच्या दिवशीच तालुक्यातील 112 गावांचा सध्या संपर्क तुटला आहे.

Continues below advertisement

पामुलगौतम नदीपलीकडील हिंदेवाडा येथील एका गर्भवती महिलेला अचानक प्रसुतीच्या वेदना झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र पर्लकोटासह, पामुलगौतम नदी देखील तुडुंब भरून वाहत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे होते. आज 27 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास एसडीआरएफ टीमच्या मदतीने बोटीद्वारे पामुलागौतम नदीतून रेस्क्यू करत त्या गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. अर्चना विकास तिम्मा असे त्या गर्भवती महिलेचे नाव असून सध्या तिला भामरागड तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयात प्रसुती करिता दाखल करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या