Richest Actor Of South: एक काळ होता, ज्यावेळी भारतीय सिनेसृष्टीत (Indian Film Industry) बॉलिवूडची (Bollywood News) मान कायम ताठ असायची. आणि आज बॉलिवूडसोबतच मराठी (Marathi Films), गुजराती आणि साऊथ इंडस्ट्री (South Movie) खांद्याला खांदा लावून पुढे जाते. गेल्या काही दिवसांत तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्याचमुळे साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार्सची फॅनफॉलोइंगही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काहींनी संपत्तीच्या बाबतीत टॉप सुपरस्टार्सना मागे टाकलं आहे. आज आम्ही तुम्हाला सर्वात श्रीमंत साऊथ सुपरस्टारबाबत सांगणार आहोत. या स्टारची कमाई अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खानपेक्षाही जास्त आहे.  

नागार्जुन साऊथचा सर्वात श्रीमंत अभिनेता 

तेलुगू सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी हा साऊथचा सर्वात श्रीमंत सुपरस्टार आहे. मनीकंट्रोलनं दिलेल्या माहितीनुसार, नागार्जुनची एकूण संपत्ती 410 मिलियन डॉलर्स आहे. म्हणजेच, 3572 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नागार्जुन तो शाहरुख आणि जुही चावला नंतर संपूर्ण भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक बनला आहे.

कमाईच्या बाबतीत नागार्जुन बॉलिवूड स्टार्सच्याही पुढे 

अमिताभ बच्चन (₹3200 कोटी), हृतिक रोशन (₹3100 कोटी), सलमान खान (₹2900 कोटी), अक्षय कुमार (₹2700 कोटी) आणि आमिर खान (₹019 कोटी) यांसारख्या टॉप बॉलिवूड स्टार्सना नागार्जुननं अफाट संपत्तीनं मागे टाकलं आहे.

नागार्जुनने अफाट संपत्ती कशी कमावली?

नागार्जुन तेलुगू चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे, पण तो कधीही टॉप स्टार नव्हता. टॉप सुपरस्टारचा टॅग साऊथ अभिनेता चिरंजीवीनं सर्वात जास्त काळ स्वतःकडे ठेवला, त्यानंतर प्रभास आणि राम चरणने चिरंजीवीकडून हा टॅग स्वतःकडे घेतला. तरीही, नागार्जुन त्या सर्वांपेक्षा श्रीमंत आहे. याचं कारण म्हणजे, त्याची स्मार्ट व्यावसायिक गुंतवणूक.

नागार्जुननं केवळ चित्रपटांमधूनच नव्हे तर रिअल इस्टेट, सिनेमा आणि स्पोर्ट्स फ्रँचायझींसह इतर अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक करूनही भरपूर संपत्ती कमावली आहे. नागार्जुन हा टॉलीवूडमधील सर्वात मोठ्या प्रॉडक्शन हाऊस आणि स्टुडिओपैकी एक असलेल्या अन्नपूर्णा स्टुडिओचा मालक आहे. त्याच्याकडे एन3 रिअॅल्टी एंटरप्रायझेस ही रिअल इस्टेट आणि बांधकाम कंपनी देखील आहे.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, नागार्जुनच्या मालकीच्या सर्व रिअल इस्टेट मालमत्तेची किंमत सुमारे ₹900 कोटी आहे. याशिवाय, नागार्जुनकडे तीन स्पोर्ट्स फ्रँचायझींव्यतिरिक्त खाजगी जेट आणि अर्धा डझनहून अधिक लक्झरी कारसारख्या अनेक आलिशान वस्तू आहेत.

नागार्जुनचे सर्वोत्तम सिनेमे

नागार्जुननं चित्रपटांमध्येही उत्तम कारकीर्द गाजवली, ज्यामध्ये मास, शिवा, डॉन आणि मनम सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा समावेश आहे. त्यानं खुदा गवाह, क्रिमिनल, जख्म आणि ब्रह्मास्त्र सारख्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अलिकडेच तो धनुषसोबत कुबेरा सिनेमामध्येही दिसला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री, दीपिका-करिना आसपासही नाहीत, प्रत्येक सिनेमामागे कमावते कोट्यावधी