मुंबई : सौंदर्याची खाण म्हणून ओळखली जाणारी दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) सध्या चर्चेत आहे. साऊथ इंडस्ट्रीची सुपरस्टार अभिनेत्री साई पल्लवीने तिचं निरागस सौंदर्य आणि साधेपणामुळे चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. तिच्या सौंदर्यामुळे ती कायमच चर्चेत असते, तिचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असताता. आता पुन्हा एकदा ही अभिनेत्री चर्चेत आली आहे, पण या चर्चेचं कारण तिचं वैयक्तिक आयुष्य आहे. साई पल्लवी रिलेशनशिपमध्ये असल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.


अभिनेत्री साई पल्लवी पडली प्रेमात?


अभिनेत्री साई पल्लवीने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. या चाहत्यावर्गाला तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. आता या अभिनेत्रीबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. अभिनेत्री साई पल्लवी सध्या एका अभिनेत्याला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. हा अभिनेता दोन मुलांचा बाप असल्याचंही मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे.


दोन मुलांचा बाप असणाऱ्या अभिनेत्याला डेट करतेय?


सध्या सोशल मीडियावर साई पल्लवीच्या रिलेशनशिपच्या बातम्यांनी चांगलाच जोर धरला आहे. साई पल्लवी दोन मुलांचा बाप असलेल्या अभिनेत्याला डेट करत असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत अभिनेत्री साई पल्लवीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, चाहत्यांकडून सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय बनला आहे. अनेक जण अभिनेत्रीच्या समर्थनार्थ उतरले आहेत, तर काही जण टीका करताना पाहायला मिळत आहेत.


विवाहित अभिनेत्यासोबत अफेअर?


अभिनेत्री सई पल्लवी तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतेच. पण, सध्या ती लव्ह लाइफमुळे चर्चेत आली आहे. साई पल्लवी विवाहित अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा आहे. साई पल्लवीच्या अफेअरच्या अफवा उडताना पाहायला मिळत आहे. सिनेजोशच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री साई पल्लनी सध्या रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. साई पल्लवीचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिच्या अफेअरच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.


कोणत्या अभिनेत्याला डेट करतेय साई पल्लवी?


दोन मुलांचा बाप असलेल्या विवाहित अभिनेत्यासोबत अभिनेत्री साई पल्लवीचं अफेअर  सुरु असल्याचा दावा माडिया रिपोर्टमधून करण्यात येत आहे. या अभिनेत्याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, या बातम्या केवळ अफवा असल्याचंही बोललं जात आहेत. अभिनेत्रीकडून आतापर्यंत या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.