Nayanthara  : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री नयतारा (Nayanthara) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नयनताराचा लवकरच विवाह सोहळा पार पडणार आहे. ती चित्रपट निर्माता विग्नेश शिवनसोबत (Vignesh Shivan) लग्नगाठ बांधणार आहे. 2015 पासून नयनतारा ही विग्नेशला डेट करत आहे. आता लवकरच त्या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. 


रिपोर्टनुसार, नयतारा आणि विग्नेश शिवन हे दोघे 9 जून 2022 रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. नयनतारा आणि विघ्नेश शिवन तिरुमला तिरुपती मंदिरात लग्न करण्याचा विचार करत आहेत. त्या दोघांच्या विवाह सोहळ्याला मोजके पाहुणे आणि त्या दोघांचे काही मित्र मैत्रिणी उपस्थित राहणार आहेत. लग्नानंतर नयनतारा आणि विघ्नेश चेन्नईमध्ये एका भव्य रिसेप्शन पार्टीचे आयोजन करणार आहेत, ज्यामध्ये इंडस्ट्रीतील बरेच लोक उपस्थित असतील. 


गेल्या वर्षी नयतारा आणि विग्नेश यांचा गेल्या वर्षी साखरपुडा झाला. नयनतारानं 25 मार्च 2021 रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांना दिली. या फोटोमध्ये नयनतारा रिंग फ्लॉन्ट करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करुन नयनतारानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझ्या बोटांमध्ये माझी जीवनरेखा बांधली' असं कॅप्शन दिलं. 


नानुम राउडी धन या चित्रपटासाठी नयनतारा आणि विग्नेश यांनी एकत्र काम केलं होतं. नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांचा नुकताच प्रदर्शित झालेला 'काथुवाकुला रेंदू कादल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.  चित्रपटाचे दिग्दर्शन विघ्नेशने केले होते. तर नयनतारा, विजय सेतुपती आणि समंथा रुथ प्रबू या कलाकारांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली.






नयनतारा तिच्या अनेक अगामी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गॉडफादर, कनेक्ट आणि अॅटलीज अनटाइटेड या चित्रपटामध्ये नयनतारा ही शाहरुख खानसोबत काम करणार आहे. तसेच विघ्नेशचा AK62 हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी समंथानं देखील नयनतारासोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोला समंथानं खास कॅप्शन दिलं होतं. 


हेही वाचा :