Sonam Kapoor On Karwa Chauth : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. सोनमच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच तीचं चाहत्यांकडून कौतुक होत असतं. नुकतीच सोनम कपूर आई झाली आहे. त्यामुळे सध्या ती तिच्या बाळाबरोबर पालकत्वाचा आनंद घेतेय. मात्र, सोनम सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
दरम्यान, नुकत्याच आई झालेल्या सोनम कपूरने लग्नाच्या चार वर्षानंतर करवा चौथच्या व्रताबद्दल खुलासा केला आहे. सोनमने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने चाहत्यांना सांगितले की, "परंपरेनुसार मी करवा चौथचा उपवास करीत नाही. याचं कारण तिचा पती आनंदला उपवास आवडत नसल्याने ती ठेवत नाही. पण, भारतीय सण आणि सणाचा आनंद घ्यायला दोघांना खूप आवडतं." सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनम करवा चौथसाठी तयार होण्याबरोबरच तिचा मुलगा वायूला स्तनपान (BreastFeeding) करतेय.
पाहा व्हिडीओ :
"खऱ्या जगात परतणे खूप छान आहे" - सोनम कपूर
सोनमचा मुलगा तिच्या मांडीवर असून ती त्याला स्तनपान करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या दरम्यान तिचा मेकअप करणारी पूर्ण टीम तिच्याबरोबर दिसतेय. तसेच, सोनमचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. तसेच, सोनम लेहेंगा आणि ज्वेलरीमध्ये खूपच सुंदर दिसतेय.
हा व्हिडिओ शेअर करताना सोनम कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या टीमसोबत खऱ्या जगात परतणे, कपडे घालून लोकांना भेटणे खूप छान आहे. आपल्या होम ग्राऊंडवर परतणे खूप छान आहे. Love U Mumbai #मुंबई." सोनमला सशक्त आई म्हणत असताना, तिचा नवरा आनंद आहुजानेही तिचे कौतुक केले आहे.
याआधीही अनेक महिलांनी आपलं काम सांभाळून आपल्या मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना स्तनपान केलं आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन राजकारणी Larissa Waters यांनी देखील सभागृहात स्तनपान केले होते.
महत्वाच्या बातम्या :