Coronavirus Cases Today in India : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची नवीन आकडेवारी जारी केली आहे. देशात 2 हजार 430 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग कायम आहे. गेल्या 24 तासांत देशातील कोविड-19 रुग्णांमध्ये 248 रुग्णांची घट नोंदवण्यात आली आहे. काल ही संख्या 2,678 वर होती. गेल्या 24 तासांत 17 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


देशातील कोरोना प्रादुर्भावात घट


देशात कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 2430 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर एकूण कोरोना बाधितांची संख्या 4 कोटी 46 लाख 26 हजार 427 झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं  (Ministry Of Health) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची (Active Cases) संख्या 26 हजार 618 वर पोहोचली आहे.






देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 26 हजारांवर


मागील 24 तासांत म्हणजेच शनिवारी दिवसभरात देशात दोन हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 5 लाख 28 हजार 874 वर पोहोचली. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 26 हजारांवर कायम आहे. सध्या देशात 26 हजार 618 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांत देशात 2 हजार 378 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.







महाराष्ट्रातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 2759 वर


महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या काहीशी स्थिर असल्याचं दिसून येत आहे. आज राज्यात 477 नवीन रुग्णांची भर पडली असून 319 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर चार रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 2759 वर पोहोचली असून सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबईमध्ये आहे. राज्यात मुंबई शहरात सर्वाधिक म्हणजे 1093 सक्रिय रुग्णसंख्या असून त्या खालोखाल पुण्यात 564 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आढळली आहे. ठाणे शहरात 443 सक्रिय रुग्ण आढळले आहेत.