Sonali Bendre : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) कॅन्सर या आजाराचा सामना करत होती. आता सोनालीनं कॅन्सरवर मात करुन छोट्या पडद्यावर जोरदार कमबॅक केलं.  डान्स इंडिया डान्स लिटील चॅम्प (Dance India Dance little Champ) या शोचं सोनाली परिक्षण करत आहे. सोनालीसोबतच अभिनेत्री मौनी रॉय आणि कोरिओग्राफर रेमो डिसूजा देखील या शोचे परिक्षण करत आहेत. अनेक वेळा ट्रोलर्स छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोला ट्रोल करतात. टीआरपी वाढवण्यासाठी  रिअॅलिटी शोमध्ये दाखवण्यात आलेल्या इमोशनल स्टोरी या फेक असतात, असा आरोप ट्रोलर्स करतात. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सोनालीनं ट्रोल करणाऱ्यांना  सडेतोड उत्तर दिलं आहे. 


मुलाखतीमध्ये सोनाली म्हणाली, 'खोट्या स्टोरीज तयार करायची गरज नाही. अशा गोष्टी आपल्या देशात घडत आहेत. काही आई- वडिलांना असं वाटतं की वाईट परिस्थितीमधून त्यांचा मुलगा बाहेर पडावा. ज्यामुळे त्यांच्या मुलाला चांगलं आयुष्य जगण्याची संधी मिळेल. त्या मुलांच्या आयुष्याची ही रिअॅलिटी आहे. 


सोनाली बेद्रेनं इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या कार्यक्रमाचे देखील परिक्षण केलं आहे. हम साथ साथ है, चल मेरे भाई आणि लज्जा या चित्रपटतील सोनालीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 4  जुलै 2018 रोजी सोनालीनं सोशल मीडियावर तिला कॅन्सर झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. सोनाली ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या पोस्ट तसेच तिचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. 


संबंधित बातम्या 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha