Easter 2022 : पतौडी कुटुंबाची लाडकी लेक अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) आणि अभिनेता कुणाल खेमू (Kunal Khemu) यांची जोडी भलेही मोठ्या पडद्यावर झळकली नसेल, पण त्यांची खऱ्या आयुष्यातील प्रेमकथा एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही आणि त्यांच्या या परीकथेतील प्रेमकथेत छोटी परी म्हणून आलेल्या इनायाने त्यांचे आयुष्य आनंदाने भरले आहे. इनायाच्या एका क्युट स्माईलवर तिचे संपूर्ण कुटुंबच नाही, तर संपूर्ण देश मनापासून प्रेम करतो. छोट्या इनायाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. संपूर्ण कुटुंबाने इनायाला राजकुमारी सारखे ठेवले आहे. पण, नुकत्याच समोर आलेल्या एका फोटोमध्ये इनायाला पाहून सर्वांनाच हसू फुटले आहे.


आई सोहा अली खानने तिच्या लाडक्या मुलीला टॉयलेट पेपरने गुंडाळले आहे आणि तिला ‘इस्टर एग’ बनवले आहे. चिमुकल्या इनायाचा हा फोटो स्वतः सोहा अली खानने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि त्यांच्या कलाकृतीचा नमुना सादर केला. यावेळी प्रयोग करताना सोहा अली खानने एक खास अंडं बनवलं असून, या अंड्याचे नाव ‘इनाया नौमी खेमू’ आहे.


पाहा पोस्ट :



इनायाच्या या फोटोवर केवळ चाहतेच नाही, तर बॉलिवूडच्या अनेक स्टार्सचीही नज खिळली आहे. या फोटोवर सातत्याने लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. विविध प्रकारे कमेंट करून कोणी इनायाला क्यूट म्हणत आहेत, तर कोणी तिला ‘स्पेशल अंडा’ म्हणत आहेत, तर काही युजर्स हसत हसत सोहा अली खानला विचारत आहेत की, मॅडम तुम्ही बिचाऱ्या इनायासोबत असं का करत आहात... हा फोटो शेअर करत सोहाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझे छोटे इस्टर अंडे आता तयार आहे...’


हेही वाचा :