Sofia Vergara and Joe Manganiello : हॉलिवूडमधील (Hollywood) सर्वात प्रिय जोडप्यांपैकी एक, सोफिया व्हर्गारा (Sofia Vergara) आणि जो मँगॅनिएलो (Joe Manganiello) यांनी घटस्फोट घेत असल्याची घोषणा केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. स्पायडरमॅन (Spiderman) फेम प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता जो मँगॅनिएलो (Joseph Michael Manganiello) याने पत्नी अभिनेत्री सोफिया वर्गारा (Sofia Vergara) हिला घटस्फोट दिला आहे. या दोघांनी सात वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 


'स्पायडर मॅन' फेम अभिनेत्याचा घटस्फोट


'मॉडर्न फॅमिली' स्टार सोफिया वर्गाराने सात वर्षांच्या संसारानंतर जो मँगॅनिएलोपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांनीही एक याबाबत प्रतिक्रिया देत हा सर्वात कठीण निर्णय असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या आयुष्यातील नवीन टप्प्यावर जाताना लोकांनी त्यांना प्रायव्हसी द्यावी, असे आवाहनही स्टार्सनी केले आहे. मॉडर्न फॅमिली अॅक्टर आणि ट्रू ब्लड मधील या जोडप्याचा अभिनय चाहत्यांच्या मनात घर करून गेला होता. हे जोडपं अत्यंत प्रसिद्ध आणि चाहत्यांच्या आवडीचे होतं. त्यामुळे यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांची निराशा झाली आहे. 


सात वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय


सोफिया वर्गारा आणि जो मँगॅनिएलो यांनी त्यांच्या घटस्फोटाची घोषणा करत संयुक्त निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, "आम्ही घटस्फोट घेण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. एकमेकांवर खूप प्रेम करणारे आणि त्यांची काळजी घेणारे दोन लोक म्हणून आम्ही आम्ही आमच्या आयुष्याच्या या नवीन टप्प्यावर आमच्या गोपनीयतेचा आदर करण्याची आम्ही सर्वांना नम्रपणे विनंती करतो."




काही दिवसांपासून वेगळं राहत होते


मीडिया रिपोर्टमध्ये एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'सोफिया आणि जो काही काळापासून वेगळे होत आहेत आणि त्यांच्या भविष्याचा विचार करण्यासाठी एकमेकांपासून काही अंतर ठेवत आहेत.' वृत्तानुसार, हे जोडपे जूनमध्ये होबोकेनमध्ये शेवटचे एकत्र पाहिले गेले होते, जेव्हा सोफियाने जोला त्याच्या नवीन प्रोजेक्ट नॉन्स विथ विन्स वॉनच्या सेटवर भेट दिली होती.


जो मँगॅनिएलो आणि सोफिया वर्गारा यांची लव्ह स्टोरी


जो मँगॅनिएलो आणि सोफिया वर्गारा यांनी 2015 मध्ये लग्न केलं होतं. 'स्पायडर-मॅन' अभिनेत्याने पॉडकास्टमध्ये खुलासा केला होता की, त्याने 2010 मध्ये एमटीव्ही म्युझिक अवॉर्ड्समध्ये व्हर्गाराला पहिल्यांदा पाहिलं होतं आणि त्याचं पहिल्या नजरेत तिच्यावर प्रेम जडलं. त्यानंतर, चार वर्षांनंतर जोला सोफियाला भेटण्याची संधी मिळाली. व्हाईट हाऊसमधील डिनरमध्ये जो मँगॅनिएलो आणि सोफिया वर्गारा पहिल्यांदा भेटले. त्यानंतर त्यांची मैत्री आणि प्रेम झालं. यानंतर 2015 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.