Horoscope Today 21 November 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 21 नोव्हेंबर 2025, आजचा वार शुक्रवार आहे. आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज घरामध्ये तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात, परंतु प्रसन्न मन, आरोग्य चांगले ठेवायला मदत करेल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज मनाविरुद्ध झालेल्या गोष्टींवर फार विचार केला नाही तर, समाधानी राहाल.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायामध्ये मनासारखे काम करायला मिळेल, विद्यार्थ्यांनी अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करावे 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज परिस्थितीशी टक्कर देण्याच्या वृत्तीचा तुम्हाला गर्व वाटेल, वैवाहिक जीवनात जोडीदाराचे वर्चस्व सहन करावे लागेल  

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज गुप्त शत्रूच्या कारवायांना बळी पडण्याची शक्यता आहे व्यवसाय नोकरीत आपण बरे ने आपले काम बरे हा दृष्टिकोन ठेवावा  

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज वादाचे प्रसंग टाळावेत, धंद्यामध्ये स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज आपल्या मध्ये काय सुधारणा करता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या, आर्थिक बाबतीत गुंतवणूक नको 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज महिलांनी मनःशांतीसाठी उपासना करावी, यशाची जबरदस्त आसक्ती ठेवाल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज जिद्दीने कामाला लागल प्रसिद्धी क्षेत्रामध्ये अचानक चढ-उतार झालेले लक्षात येतील 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज वडिलोपार्जित इस्टेटिसंबंधीच्या कामाला गती येईल, त्यातील बरीच कामे मार्गी लागतील 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज विजेच्या संपर्कात काम करणाऱ्यांना काळजी घेणे आवश्यक आहे, पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज प्रेम प्रकरणांमध्ये यश येईल, विवाहासाठी आयुष्याचा जोडीदार निवडता येईल.

हेही वाचा

Margashirsha 2025 Lucky Zodiacs: पैसा..करिअर..प्रेमात नशीब फळफळणार! मार्गशीर्ष महिन्याच्या 3 लकी राशी, अखेर अच्छे दिन आलेच, कोणत्या राशी मालामाल होणार?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)