Buldhana News : आधीच जिल्हा परिषद शाळेची पट संख्या मोठ्या प्रमाणात घटत असताना, बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर या आदिवासी भागातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी कसा खेळ केला जात आहे. याचा धक्कादायक व्हिडिओ Abp माझाच्या हाती आला आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतून (Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Scheme) शालेय पोषण आहार देण्यासाठी मोठी नियमावली शासनाने तयार केली आहे. मात्र नियमावली धाब्यावर बसवून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ शाळा प्रशासन करत आहे. प्राथमिक शाळेतील मुलांना सकस पोषण आहार देताना मोठी काळजी घेण्याच्या सूचना असताना ही या मुलांना चक्क रद्दी पेपरवर खिचडी दिल्या जात आहे. तर मुलं पोषण आहार घेत असताना चक्क श्वान त्यांच्या भोवती फिरताना दिसत आहेत.

Continues below advertisement

Buldhana News : नियमावली धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

खर तर या चिमुकल्यांना पोषण आहार देण्यासाठी प्रत्येक शाळेला शासनाने स्टीलच्या प्लेट उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र स्टीलच्या प्लेटमध्ये पोषण आहार न देता रद्दी पेपरवर पोषण आहार दिल्या जात असल्याने मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तर मुलं पोषण आहार खाताना त्यांच्या अवतीभवती श्र्वानांचा मुक्त संचारही दिसत आहे. मुख्याध्यापक आणि कर्मचारी आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी कसं खेळतायेत हे या धक्कादायक घटनेतून समोर आलंय.

अनुचित प्रकार घडला तर जवाबदारी कुणाची?

दरम्यान, याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी विकास पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत चार महिन्यांपूर्वी मी जिल्ह्यातील सर्व शाळांना कडक आदेश दिले होते, अस ते म्हणाले. मात्र अशा प्रकारे विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार दिल्या जात असेल तर आणि काही अनुचित प्रकार घडला तर जवाबदारी कुणाची? असा प्रश्न आता उपस्थित राहत आहे. अतिशय धक्कादायक हा प्रकार असून शालेय शिक्षणमंत्री यावर काही कारवाई करतील का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यामुळे मात्र पालकांत संताप निर्माण होत आहे.

Continues below advertisement

शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून विद्यार्थी शाळा ऐवजी जंगलात लपून बसू लागल्याची धक्कादायक घटना जव्हार मध्ये समोर आली आहे. जव्हारच्या जांभूळमाथा येथील शिक्षक लोकनाथ जाधव यांनी शुक्रवारी काही विद्यार्थ्यांना दोन किलोमीटर लांब असलेल्या झर्‍यावर पाणी आणण्यासाठी पाठवलं. मात्र पाणी घेऊन शाळेत परतणाऱ्या विद्यार्थ्यांना उशीर झाल्याने या शिक्षकांनी चार ते पाच विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. ही मारहाण होत असताना काही विद्यार्थ्यांनी पाहिलं असून या विद्यार्थ्यांनी शाळेत न जाताच दिवस जंगलात लपून काढला. हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

दरम्यान, मारहाण करणारे शिक्षक लोकनाथ जाधव यांच्या विरोधात ग्रामस्थांनी यापूर्वी देखील अनेक तक्रारी केल्या असताना गटशिक्षणाधिकारी तसेच वरिष्ठांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने पालकांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. पहिली ते आठवीपर्यंत असलेल्या या शाळेत 96 विद्यार्थ्यांची पटसंख्या असून शिक्षक लोकनाथ जाधव हे उशिराने येणे दिवसभर मोबाईल मध्ये असणार तसंच विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष असे प्रकार करत असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी पालकांचं ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कडून करण्यात येत आहे

इतर महत्वाच्या बातम्या


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI