मुंबई : सुनीता उपदृष्टा पुन्हा एकदा आपल्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. सुनीताने पुन्हा एकदा लग्न करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, असं सांगितलं जात आहे की, ती लवकरच दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. दरम्यान, अद्याप सुनीताने यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. सुनीता उपदृष्टा सिंगल मदर असून टीव्ही प्रोड्यूसर किरण यांची पत्नी होती.


मीडिया रिपोर्टनुसार, गायक, होस्ट आणि डबिंग आर्टिस्ट सुनीताने एका खाजगी सोहळ्यात साखरपुडा केला आहे. सुनीताने एका मीडिया हाउसचे अध्यक्षांशी साखरपुडा केला आहे. सुनीताच्य लग्नाच्या तारखेसंदर्भात घोषणा करण्यात आलेली नाही.


याआधी सुनीता उपद्रष्टाने केवळ वयाच्या 19व्या वर्षी टीव्ही प्रोड्यूसर किरण यांच्याशी लग्न केलं होतं. परंतु, दोघांचं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सुनीता उपद्रष्टाने तेलगूमध्ये अनेक गाणी गायली आहे. तसेच तिला तिच्या गाण्यांसाठी अनेक राज्य पुरस्कारही मिळाले आहेत.


सुनीता उपद्रष्टाने गायिक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात 'ए वेला लो नीवु' या गाण्याने केली होती. हे गाणं सिरीवनेला सीताराम शास्त्री यांनी लिहिलं होतं. गायकाने 1997मध्ये कन्नड भूमी गीतामध्ये राष्ट्रीय फिल्म पुरस्कारासाठी सिंगल गायलं होतं. संगीत वादक इलैयाराजाने याला म्युझित दिलं होतं. सुनिताचं सध्याचं गाणं 'नीली नीला उर्फसम' लाही चाहत्यांची पसंती मिळाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :