देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1. कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून आज 'भारत बंद'ची हाक; विरोधी पक्षांसह, सेलिब्रिटींचंही समर्थन


 

  1. 'भारत बंद'च्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज्यांना नियमावली, सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी सूचना


 

  1. देशव्यापी बंदमध्येही मुंबई सुरु राहणार, दुकानं बंद न ठेवण्याचा निर्णय; तर बेस्ट बससह, रिक्षा, टॅक्सीही धावणार, भाजीपाल्याच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता


 

  1. शरद पवारांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो, मात्र ते राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य


 

  1. फायझर, सीरमनंतर भारत बायोटेक कंपनीचीही कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सरकारकडे विनंती, परवानगीसाठी तीन कंपन्या प्रतिक्षेत


 

  1. स्मार्टफोन-आधारित COVID-19 चाचणी, 30 मिनिटांपेक्षा कमी वेळात रिझल्ट; सीआरआयएसपीआरवर आधारित नवीन तंत्र शास्त्रज्ञांकडून विकसित


 

  1. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 93.28 टक्के; राज्यात काल दिवसभरात 3075 नवे रुग्ण तर मुंबईतही 544 कोरोना बाधितांची नोंद


 

  1. काल दिवसभर प्रयत्न करुनही 'मिशन बिबट्या' फेल; करमाळा तालुक्यात तीन बळी घेणारा नरभक्षक बिबट्या फायर चुकवत पसार


 

  1. गडचिंचले हत्या प्रकरणातील 47 आरोपींना जामीन मंजूर, ठाणे कोर्टाकडून जामीन; या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 105 जणांना जामीन


 

  1. नवी मुंबई महापालिकेच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचं निलंबन, आयुक्तांची कारवाई; उद्यानं बंद असतानाही कामे दाखवल्याचा आरोप