मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलनाच्या विरोधात ट्वीट केल्यामुळे चर्चेत आहे. याचवरुन तिच्यात आणि अभिनेता दिलजीत दोसांजमध्येही ट्विटर वॉर झालं होतं. अशातच आता कंगनाने शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 'भारत बंद' संदर्भात ट्वीट केलं आहे. कंगनाचं हे ट्वीट वेगाने व्हायरल होत आहे. कंगना रनौत 'भारत बंद'च्या विरोधात आहे. अशातच तिने एका वेगळ्या अंदाजात भारत बंदचा विरोध केला आहे. कंगना रनौतने सद्गुरूंचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. ज्यामध्ये आंदोलनाबाबत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.





व्हिडीओ शेअर करताना कंगनाने लिहिलं आहे की, आओ भारत को बंद कर देते हैं, यूँ तो तूफानों कि कमी नहीं इस नाव को, मगर लाओ कुल्हाड़ी कुछ छेद भी कर देते हैं, रह रह के रोज मरती है हर उम्मीद यहाँ, देशभक्तों से कहो अपने लिए देश का एक टुकडा अब तुम भी माँग लो, आजाओ सडक पे और तुम भी धरना दो, चलो आज यह किस्सा ही खत्म करते हैं."


कंगनाने या ट्वीटला सोशल मीडिया युजर्सच्या सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. तर अनेक युजर्स कंगनाच्या या ट्वीटवर टीकाही करत आहेत. तसेच अनेकांनी कंगनाने घेतलेली भूमिका चुकीची असल्यांचं म्हणत आहेत.


दरम्यान, याआधी शेतकरी आंदोलनावर केलेल्या ट्वीटवरुन कंगनावर टीकेची झोड उठली होती. कंगना रनौतने शेतकरी आंदोलनातील एका वृद्ध महिलेला 100 रुपये दैनंदिन रोजगारी आंदोलनकर्ते असं म्हटलं होतं. कंगनाने म्हटलं की, "ज्या दिवशी शाहीन बागप्रमाणेच या आंदोलनाचं रहस्य उलगडेल, त्या दिवशी मी एक सुंदर भाषण लिहीन आणि तुम्हा लोकांचं तोंड काळं होईल."


कंगनाच्या ट्वीटनंतर अभिनेता दिलजीत दोसांजने कंगनावर टीका करत ट्वीट केलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये ट्विटर वॉर झाल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाहीतर, इतरही सेलिब्रिटींनी कंगनाचं हे ट्वीट चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. तसेच अनेकांनी कंगनाला खडे बोलंही सुनावले होते.


महत्त्वाच्या बातम्या :