मुंबई : 'बाहुबली' सुपरस्टार प्रभासच्या आगामी 'सलार' चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. 'केजीएफ' सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे प्रशांत नील या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. काही दिवसांपूर्वीच अशी बातमी आली होती की प्रशांत आणि प्रभास एकत्र काम करणार आहेत. चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर बुधवार 2 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आलं असून सिनेमांच प्री-प्रॉडक्शनचं कामही सुरू झालं आहे.


'सलार' चित्रपट पूर्ण अ‍ॅक्शनने भरलेला असेल आणि पोस्टरमध्ये प्रभासचा बंदूक घेऊन असलेला लूक बर्‍यापैकी इन्टेन्स दिसत आहे. प्रशांत नीलने फर्स्ट लूक पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'सर्वात हिंसक लोक एका माणसाला सर्वात हिंसक म्हणतात.'





सलार सिनेमाचं शूटिंग पुढील वर्षाच्या मध्यावर सुरू होऊ शकते, असं सांगण्यात येत आहे. चित्रपटाची उर्वरित स्टारकास्ट अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी, चित्रपट संपूर्ण भारतात पाच ​​भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे निश्चित झाले आहे. 'केजीएफ: भाग 2' च्या शूटिंगनंतरच प्रशांत या चित्रपटावर काम सुरू करणार आहे. प्रभासचे देखील आता 3 चित्रपट आहेत. सध्या तो हैदराबादमध्ये ‘राधे श्याम’ चित्रपटाच्या चित्रीकरणात आहे. त्यानंतर तो दीपिका पादुकोणसोबतत नाग अश्विनच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात उतरणार आहे. ओम राऊत याच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये प्रभास रामाच्या भूमिकेत असणार आहे. प्रभास सोबत या सिनेमात सैफ अली खान आणि कृती सेनन यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.