Singer KK  : गायक केके (KK) यांचे काही दिवसांपूर्वी कोलकाता येथे निधन झाले. सोमवारी केके यांच्या मृत्यूचा तपास हा सीबीआयकडून करण्यात यावा, यासाठी जनहित याचिका दाखल करण्यासाठीचा अर्ज उच्च न्यायालयाचे वकील रविशंकर चटर्जी यांनी दाखल केला. कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव यांच्या खंडपीठामध्ये हा अर्ज दाखल करण्यात आला. न्यायाधिशांनी आता जनहित याचिका दाखल करुन घेतली आहे.


कोलकातामधील पोलीस हे सध्या केके यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये केके यांच्या मृत्यूचे ह्रदयविकाराचा झटका हे देण्यात आले होते. पण विरोधी पक्षापासून ते राज्यपालांपर्यंत अनेकांनी कार्यक्रमाच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे आता हे प्रकरण कोर्टामध्ये पोहोचलं आहे. 


केके यांच्या मृत्यूनंतर कॉन्सर्टमध्ये ढिसाळ व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोलकाता मेट्रोपॉलिटन डेवलपमेंट अथॉरिटीच्या (KMDA) महासंचालक सुप्रियो मैती यांच्या नेतृत्वाखालील KMDA च्या टीमनं नजरुल मंचच्या पायाभूत सुविधांची पाहणी केली. आता ही टीम तिथे कॉलेज फेस्टवर बंदी घालण्याचा विचार करत आहेत. रिपोर्टनुसार, नझरूल स्टेजची क्षमता 2,700 ते 3,000 पर्यंत मर्यादित आहे, परंतु कॉन्सर्टच्या वेळी जवळपास 6,000 लोकांचा जमाव तिथे होता, तिथे बरेच लोक पायऱ्यांवर बसले होते. तर काही लोक हे उभे राहून कॉन्सर्ट पाहात होते.  केएमडीएच्या टीमचे असे मतं आहे की गर्दीच्या जागेमुळे एयर कंडीशनिंग मशिन्सचा प्रभाव कमी झाला आणि त्यामुळे गुदमरल्यासारखे झाले. कोलकाताचे महापौर आणि राज्याचे परिवहन मंत्री फिरहाद हकीम यांनी सांगितलं की, केके यांच्या लोकप्रियतेमुळे मैफल पाहण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण येत होते.


केके यांच्या निधनानंतर राज्यपाल जगदीप धनखड यांनी कार्यक्रमाच्या ढिसाळ व्यवस्थेबाबत स्थानिक प्रशासनाला जबाबदार ठरवलं होतं.  


हेही वाचा: