Dhoop Paani Bahne De Song Out : गायक केके (KK) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. केके यांची अनेक गाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. केके यांनी गायलेलं शेवटचं गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचे रेकॉर्डिंग रविवारी झाले होते. केके यांचं शेवटचं गाणं ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
'धूप पानी बहने दे' गाण्याची चाहत्यांना उत्सुकता
केके यांनी 'शेरदिल द पीलीभात सागा' या सिनेमासाठी शेवटचं गाणं गायलं होतं. 'धूप पानी बहने दे' (Dhoop Paani Bahne De) असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले आहेत. तर शांतनु मोइत्रा यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तरण आदर्शने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे.
'शेरदिल द पीलीभात सागा' या सिनेमात पंकज त्रिपाठी, नीरब काबी आणि सयानी गुप्ता मुख्य भूमिकेत आहेत. श्रीजीत मुखर्जी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा सिनेमा 24 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची केके यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
केके बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक होते. बॉलिवूडमधील 200 हून अधिक सुपरहिट गाणी त्यांनी गायली आहेत. 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमातील 'तडप तडप के इस दिल से' हे त्यांचं गाणं लोकप्रिय झालं होतं. 'खुदा जाने' सारखे रोमँटिक गाणे, 'इट्स द टाइम टू डिस्को' आणि 'कोई कहे कहता रहे' सारखे डान्स नंबर्स तसेच 'तडप तडप के इस दिल से' सारखे सॅड सॉन्गस आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत.
केके यांनी हिंदीसोबतच नऊ भाषांमधील गाणी रेकॉर्ड केली आहेत. हिंदी आणि मराठीबरोबरच तमिळ, तेलगू, मल्याळम, ओरिया आणि आसामी या भाषांमधील गाणी देखील केके यांनी गायली आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये केकेनं 200 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. फिल्मफेअरनेदेखील केके यांना गौरविण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या