Singer KK funeral : कृष्णकुमार कुननाथ म्हणजेच केके (KK) हे अनंतात विलीन झाले आहेत. केके यांच्यावर वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. केके यांच्या मुलाने त्याच्या वडिलांना मुखाग्नी दिला आहे.  केके यांच्या अखेरच्या प्रवासात 'केके अमर रहे'च्या घोषणाही देण्यात आल्या. यावेळी गायक केके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आले होते. अभिजित भट्टाचार्य, श्रेया घोषाल, जावेद अली, सलीम मर्चंट यांच्यासह केके यांचे अनेक मित्र आणि इंडस्ट्रीतील कलाकार, गायक केके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहचले होते. तसेच कबीर खान, सुलेमान, शंतनु मोहित्रा, अल्का याग्निक, गीतकार समीर, जतीन पंडीतसारखे संगीत विश्व आणि चित्रपटसृष्टीतील मंडळी केके यांच्या निवासस्थानी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दाखल झाले होते. 


दुसरीत असताना गायलं पहिलं गाणं


केके यांचा जन्म दिल्लीमध्ये  जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी झाला होता. दिल्लीतील माउंट मेरी स्कूलमध्ये केके यांनी शिक्षण घेतलं. इयत्ता दुसरीत असताना त्यांनी आपले पहिले गाणं गायले. तसेच केके यांनी किरोडी मल कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. ग्रॅज्युएशननंतर केके यांनी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीही केली आणि या दरम्यान त्यांनी 35 हजारांहून अधिक जिंगल्स गाण्यांचा रेकॉर्ड केला. 1999 मध्ये त्यांचा पल नावाचा त्यांचा पहिला अल्बम रिलीज केला.



प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी केके यांना बॉलिवूडमध्ये गाण्याची पहिली संधी दिली. 'माचीस' चित्रपटातील गाण्यांमधून गायक केके यांना विशेष लोकप्रियता मिळाली. माचीस चित्रपटामधील छोड आये हम... या चित्रपटातील गाण्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल चुके सनम'  या चित्रपटामधील तड़प तड़प के... या केके यांच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 


 नऊ भाषांमध्ये केली गाणी रेकॉर्ड


केके यांनी हिंदीसोबतच नऊ भाषांमधील गाणी रेकॉर्ड केली आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये केकेनं 200 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. फिल्मफेयर अवार्ड देऊन देखील केके यांनी गौरवण्यात आलं आहे.


इतर संबंधित बातम्या