Hana Horka : चेक गणराज्य येथील प्रसिद्ध गायिका हाना होरका (hana horka) यांचा कोरोनामुळे (corona) मृत्यू झाला आहे. वयाच्या 57 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी कोरोना लस घेतली नव्हती. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये हाना यांनी त्यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती दिली होती. 


हाना होरका या असोनेंस बँडच्या गायिका होत्या. हाना यांचा मुलगा रेकनं आणि त्यांच्या पतीनं लस घेतली होती. रेकनं एका रेडिओ शोमध्ये सांगितले होते की, त्याच्या आईनं कोरोनाची लस घेतली नव्हती. रेकनं सांगितलं होत की, त्याला आणि त्याच्या वडीलांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा हाना या त्यांच्यासोबतच राहात होत्या. त्यामुळे त्यांना कोरोना झाला.


लसीकरण विरोधी मोहिमेत असणाऱ्या हाना यांच्याकडे हेल्थ पास होता. त्यांच्या कुटुंबानं सांगितलं की हेल्थ पासमुळे त्यांना चित्रपटगृहात तसेच स्टिम बाथ सेंटर येथे जाण्याची परवानगी मिळते. चेक येथे बार, कैफे आणि चित्रपटगृहांमध्ये लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळतो. 


हाना होरका यांच्या मुलानं म्हणजेच रेकनं वॅक्सिन विरोधी आंदोलन करणाऱ्या लोक हे त्याच्या आईच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याच सांगितलं. त्या   वॅक्सिन विरोधी आंदोलन करणाऱ्या लोकांनी हाना यांना लस घेण्यापासून थांबवलं होतं, असं रेकनं सांगितलं. लसीकरण विरोधी मोहिमेत हाना सहभागी होत्या. 


संबंधित बातम्या


Shahrukh khan : किंग इज बॅक! आर्यन खान प्रकरणानंतर शाहरुख खानची पहिली पोस्ट


Naagin 6 Promo : एकता कपूरच्या 'Naagin 6' चा प्रोमो रिलीज, मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


The Batman : Unmask The Truth चा पोस्टर प्रदर्शित; 'या' दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस


Boss Mazi Ladachi : 'बॉस माझी लाडाची' नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, भाग्यश्री लिमये साकारणार खडूस बॉसची भूमिका


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha