Sidhu Moose Wala Song: दिवंगत गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांचे 'SYL' गाणे रिलीज झाले आहे. सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर तब्बल 26 दिवसांनी त्यांचे नवीन गाणे रिलीज झाले आहे, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. सिद्धू मूसेवाला यांचे SYL हे गाणे सध्या यूट्यूबवर ट्रेंड करत आहे. सोशल मीडिया युझर्स हे गाणे मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. गाणे ऐकून कॉमेंट सेक्शनमध्ये दिवंगत गायकाची आठवण काढत आहेत. ‘SYL’मध्ये सिद्धू यांनी सतलज-यमुना लिंक (SYL) कालव्याचा उल्लेख केला आहे


सिद्धू मूसेवालांचे हे गाणे 4 मिनिटे 9 सेकंदाचे आहे, जे चाहत्यांना खूप आवडत आहे. या गाण्यात पंजाबचे पाणी आणि त्याच्याशी संबंधित इतर समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यासोबत पंजाब-हरियाणा यांच्यातील बहुचर्चित सतलज-यमुना लिंक (SYL) कालव्याच्या वादाचा उल्लेख करून, तो सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गाण्याच्या सुरूवातीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे हरियाणाचे प्रभारी सुशील गुप्ता यांचे विधान ऐकू येते. ज्यामध्ये ते पंजाबप्रमाणे हरियाणात 2024 मध्ये त्यांच्या पक्षाचे सरकार बनल्यास एसवायएलचे पाणी हरियाणाला मिळण्याबाबत बोलत आहेत. याशिवाय पंजाब आणि पंजाबींचा अभिमानही गाण्यात दाखवण्यात आला आहे.


पाहा गाणे :



सिद्धू मूसेवालाचे SYL हे गाणे हिट झाले आहे. रिलीजच्या अवघ्या काही तासांतच या गाण्याला सुमारे 6 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर हे गाणे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. सिद्धू मूसेवालांचे हे गाणे त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याच्या कमेंट सेक्शनमध्ये, चाहते सिद्धू यांच्या आठवणीकाढत भरपूर कमेंट करत आहेत. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की, सिद्धू त्यांच्या दमदार गाण्यांनी नेहमीच चाहत्यांच्या मनात जिवंत राहतील.


दर 5 ते 6 महिन्यांनी एक गाणे रिलीज होणार!


सिद्धू मुसेवाला यांच्या अरदासच्या वेळी त्यांच्या वडिलांनी सिद्धूला गाण्यांच्या माध्यमातून कायम जिवंत ठेवणार असल्याचे सांगितले होते. सिद्धूचे वडील बलकौर सिंह म्हणाले होते की, ते दर 5-6 महिन्यांनी सिद्धूचे एक गाणे रिलीज करतील, जेणेकरून सिद्धूची सगळी गाणी पुढील 5-7 वर्षे रिलीज होत राहतील आणि ते लोकांच्या हृदयात कायम जिवंत राहतील. 29 मे 2022 रोजी संध्याकाळी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.


संबंधित बातम्या


Sidhu Moose wala Birthday: शुभदीप सिंह सिद्धूचा सिद्धू मुसेवाला बनण्यापर्यंतचा प्रवास! गाण्यांनी जिंकलं होतं प्रेक्षकांचं मन


Sidhu Moose Wala Case : इंटरपोलकडून गोल्डी ब्रारविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी , सिद्धू मूसवालाच्या हत्येची स्वीकारली होती जबाबदारी