Yogini Ekadashi 2022 : ज्येष्ठ महिन्यातील वद्य त्रयोदशी योगिनी एकादशी नावाने साजरी केली जाते. यावर्षी 24 जून 2022 रोजी योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे. योगिनी एकादशीचे व्रत आचरल्याने सर्व प्रकारच्या पापांतून मानवाला मुक्ती मिळते, असे सांगितले जाते. भगवान श्रीकृष्णाने या व्रताचे महत्त्व विषद केले आहे. योगिनी एकादशीचे व्रताचे आचरण केल्यास 88 हजार ब्राह्मणांना भोजन घातल्याचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे.


स्वच्छता पाळा :


योगिनी एकादशीच्या व्रतामध्ये स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले पाहिजे. पूजा करण्यापूर्वी पूजास्थळ व्यवस्थित स्वच्छ करावे. त्यानंतरच ही पूजा सुरू करावी.


खोटं बोलू नये : 


एकादशी व्रत करताना खोटे बोलू नये. या व्रताचे फळ खोटे बोलून प्राप्त होत नाही.


बोलण्यात नम्रता ठेवा : 


एकादशी व्रत असताना बोलण्यात गोडपणा आणि नम्रता कायम ठेवावी. कुणालाही दुखवू नये.


दानधर्म करा :


एकादशी उपवासात सेवा भावाला विशेष महत्त्व आहे. या उपवासातही दान-धर्माचे महत्त्व सांगण्यात आले आहे. दानधर्म करावा आणि गरजू लोकांना मदत केली पाहिजे.  .


चुकीच्या कामांपासून दूर रहा :


योगिनी एकादशी व्रत करताना कोणत्याही प्रकारची चुकीची कामे करू नये. मांस, अल्कोहोल इत्यादींचे सेवन या दिवशी अजिबात करू नये.


योगिनी एकादशीचा शुभमुहूर्त : 


आषाढ कृष्ण एकादशी तिथीचा प्रारंभ 23 जून रोजी रात्री 09:41 ते 24 जून रात्री 11:12 पर्यंत आहे. योगिनी एकादशी व्रताच्या दिवशी साध्ययोग आणि शुभ योग तयार होत आहेत. जे उपवास ठेवतात ते शनिवार, 25 जून रोजी सकाळी 05:41 ते 08:12 दरम्यान उपवास सोडू शकतात. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)


महत्वाच्या बातम्या :