Sidharth Shukla Death : बिग बॉस फेम आणि हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी सिद्धार्थ शुक्लानं जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण मात्र अद्याप अस्पष्टच आहे. सिद्धार्थच्या पार्थिवाचं शवविच्छेदन झालं असून त्यासंदर्भातील अहवान मुंबई पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. सिद्धार्थचा पार्थिव रुग्णालयाच्या वतीनं कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सिद्धार्थचं पार्थिव त्याच्या राहत्या घरी नेण्यात येणार असून तिथेच अत्यंदर्शनासाठी काही वेळ ठेवलं गेलं. त्यानंतर दुपारी सिद्धार्थच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. 


हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं काल निधन झालं आहे. परंतु, त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं त्याचं निधन झाल्याचं बोललं जात आहे. परंतु, शवविच्छेदन अहवालातूनच मृत्यूचं खंर कारण कळू शकेल. मुंबईच्या कूपर रूग्णालयाने तसेच मुंबई पोलिसांनी सिद्धार्थच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अशातच आज सिद्धार्थच्या शवविच्छेदन अहवाल कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. 


बिग बॉसच्या तेराव्या सिझनचा विजेता म्हणून सिद्धार्थ नावारुपाला आला. खतरो के खिलाडी, फिअर फॅक्टर या रिअॅलिटी शोमधून सिद्धार्थ झळकला होता. याव्यतिरिक्त बॉलिवूडमध्येही सिद्धार्थ झळकला होता. हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात त्यानं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. सिद्धार्थच्या निधनामुळं टीव्ही इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहते शोकाकूल आहेत. सिद्धार्थ शुक्लाला खरी ओळख टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका बालिका वधुमधून मिळाली. त्यानंतर सिद्धार्थनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. दिल से दिल तक मालिकेतही तो झळकला होता. सिद्धार्थच्या निधनाची बातमी मिळताच मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बिग बॉस 13 मुळे सिद्धार्थ पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आला. त्यांची आणि पंजाबी अभिनेत्री शहनाज गिल या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. दोघ काही दिवसांपूर्वी एकत्र बिग बॉस ओटीटीवर दिसून आले होते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :