Shweta Tiwari : टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) मनोरंजन विश्वात स्वत:चे नाव कमावले आहे. तिने बराच काळ संघर्ष केला आणि मग ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमध्ये प्रेरणाची भूमिका करून ती रातोरात स्टार बनली. श्वेताने प्रोफेशनल लाईफमध्ये आता एक मनाचे स्थान मिळवले आहे, पण तिचे पर्सनल लाईफ नेहमीच चढ-उतारांमुळे चर्चेत आले होते.


श्वेताने वयाच्या 19व्या वर्षी टीव्ही अभिनेता राजा चौधरीसोबत लग्न केले होते. राजाचं टीव्ही करिअर काही खास नव्हतं, पण तो ‘बिग बॉस’मध्ये झळकला आहे. या शोमध्ये राजा त्याच्या रागीट वृत्तीमुळे चर्चेत आला होता. श्वेता आणि राजाचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. या लग्नानंतर दोघे एका मुलीचे अर्थात पलकचे आई-वडील झाले, पण मुलीच्या जन्मानेही त्यांचे लग्न वाचू शकले नाही. श्वेताने राजा चौधरीवर मारहाण आणि घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. श्वेताने एका मुलाखतीत अमानुष घरगुती हिंसाचाराचाही उल्लेख केला होता.


लग्नानंतर आयुष्य नरकासारखं झालं!


माझ्या मुलीने मला त्याच्याकडून मार खाताना पाहिले आहे, असे ती म्हणाली होती. लग्नानंतर आयुष्य नरकासारखं झालं होतं, त्यामुळे ते संपवणं हाच उपाय होता, या शब्दांत तिने आपल्या वेदना मांडल्या होत्या. अखेर श्वेताने राजापासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि नंतर त्याच्यापासून कायमची विभक्त झाली. घटस्फोटानंतर श्वेताला मुलगी पलकची कस्टडी मिळाली.


यानंतर 2013 मध्ये तिने टीव्ही अभिनेता अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले. या लग्नानंतर 2016 मध्ये श्वेता मुलगा रेयांशची आई झाली. यानंतर श्वेता आणि अभिनवच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि श्वेताने दुसऱ्या पतीवरही घरगुती हिंसाचार आणि अत्याचाराचा आरोप केला.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha