RRR Box Office Collection Day 6 : दिग्दर्शक एसएस राजामौली (S.S.Rajamouli) यांचा आरआरआर (RRR) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटानं 'ओपनिंग डे' लाच कोट्यवधींची कमाई केली होती. आरआरआर (RRR) चित्रपट रिलीज होऊन सहा दिवस झाले. पाहूयात या चित्रपटाचं सहाव्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...


आरआरआर या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं 120 कोटींची कमाई केली आहे. मंगळवारी (29 मार्च) या चित्रपटानं 100 कोटीचा आकडा पार केला.  रिपोर्टनुसार, या चित्रपटानं सहाव्या दिवशी 13 ते 15 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 122 कोटींपर्यंत झाले आहे. 


'आरआरआर' हा सिनेमा 25 मार्च रोजी तेलुगू, हिंदी,  तामिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रदर्शित झाला आहे.  रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 20.07 कोटी कामाई केली. ज्यानंतर शनिवारी (26 मार्च) 24 कोटी तर, रविवारी (27 मार्च) 31.04 कोटी कलेक्शन या चित्रपटानं केलं. सूर्यवंशी, 83, पुष्पा, गंगूबाई काठियावाडी आणि द कश्मीर फाइल्स या चित्रपटानंतर आता 100 कोटीचा टप्पा पार करणारा आरआरआर हा सहावा चित्रपट ठरला. 


एक आठवड्यामध्ये या चित्रपटानं बहुबलीपेक्षा जास्त कलेक्शन झालं आहे. चित्रपटामध्ये आलिया भट्ट, अजय देवगन , ज्युनियर एनटीआर  आणि राम चरण यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha