Shubhankar Tawade New Car : मराठी अभिनेता शुभंकर तावडेने वाढदिवसाच्या दिवशी स्वत:चं स्वप्न पूर्ण केलं आहे. शुभंकर तावडेने 30 व्या वाढदिवशी स्वत:ला छान भेट दिली आहे. वाढदिवसाच्या दिवशी छान काहीतरी करायचं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न मराठी अभिनेता शुभंकर तावडेने पूर्ण केलं आहे. शुभंकर तावडेने 30 व्या वाढदिवशी नवी कोरी कार स्वत:ला गिफ्ट केली आहे. 


मराठी अभिनेत्याने 30 वर्षी घेतली आलिशान कार


ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे (Veteran Actor Sunil Tawde) यांचा सुपुत्र अभिनेता शुभंकर तावडे (Shubhankar Tawde) याने नुकताच वाढदिवस साजरा केला. शुभंकर तावडेने त्याच्या 30 व्या वाढदिवसाचं फुल्ल जंगी सेलिब्रेशन केलं. या वाढदिवसाला त्याने कार खरेदी केली आहे. वाढदिवसाचं सेलिब्रेशन आणि नव्या कारचे फोटो शुभंकरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावर त्याच्या मित्रमंडळी आणि चाहत्यांसंह इतर सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.






वाढदिवसाच्या दिवशी घरी आणली 'लक्ष्मी'


शुभंकर तावडेने त्याच्या सोशल मीडियावर नव्या कारचे फोटो शेअर करत चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली आहे. शुभंकरने गाडीचं खास नावंही ठेवलं आहे. शुभंकर तावडेने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर वाढदिवसाचं सेलिब्रेशन आणि नव्या कोऱ्या आलिशान कारचा फोटो शेअर करत खास कॅप्शन देत लिहिलं आहे, "नवीन कार घेतली, तिचे नाव ‘लक्ष्मी’ ठेवलं, मी तिला आवडीने ‘फनकार’ किंवा ‘फन-कार’ म्हणतो. माझे आगामी नाटक ‘विशामृत’ झालं. खूप शुभेच्छा मिळाल्या आणि पार्टी झाली. आनंद झाला."






कोण आहे शुभंकर तावडे?


शुभंकर तावडे रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख स्टारर वेड या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकला. शुभंकर तावडे ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे यांचा मुलगा आहे. तो आगामी विषमृत नाटकामध्ये झळकणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत प्रियदर्शनी इंदलकर दिसेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मेरे करण-अर्जुन आयेंगे... सलमान-शाहरुखचा आयकॉनिक चित्रपट 29 वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर, 'या' दिवशी रिलीज होणार