Horoscope Today 29 October 2024 : आज 29 ऑक्टोबर म्हणजेच धनत्रयोदशीचा (Dhanteras 2024) दिवस. दिवाळीला सुरुवात झाली असल्या कारणाने आजचा दिवस फार शुभ आहे. आज काही राशींवर लक्ष्मीची कृपा होऊ शकते. तर, काही राशींना संकटाच सामना करावा लागू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


तूळ रास (Libra Today Horoscope)


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार फलदायक असणार आहे. तुमच्या कुटुंबात अनेक दिवसांपासून सुरु असलेले वाद आज संपुष्टात येतील. आज तुम्हाला तुमच्या नोकरी संदर्भात एखादी चांगली बातमी मिळू शकते. एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्हाला तुमच्या मुलाच्या करिअर संबंधित एखादी चिंता सतावू शकते. 


वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार धावपळीचा असणार आहे. तुम्हाला तुमचं काम पूर् करण्यासाठी फार धावपळ करावी लागेल. आजच्या दिवसांत कोणाला दान करु नका किंवा पैसे उधारी देऊ नका. आज तुम्ही तुमच्या करिअर संबंधित एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. पण तुम्हाला थोडं सावध राहावं लागेल. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो. 


धनु रास (Sagittarius Today Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तसेच, तुम्हाला पुढच्या काही दिवसांत प्रवासाला जाण्याचा योग येऊ शकतो. जर तुम्हाला एखाद्या नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमची एखाद्या मोठ्या व्यक्तीशी भेट होऊ शकते. तुमच्या व्यवसायात जर तुम्हाला काही बदल करायचे असतील तर तुम्ही करु शकता. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                         


Shani Gochar : 2025 मध्ये शनीची बदलणार चाल; कुंभ, मीनसह 'या' राशींची होणार 'बत्ती गुल', तर 'या' राशींची होणार दिवाळी