Shobitha Shivanna Suicide: प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टारचा (Television Star) तिच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आल्यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टारनं आत्महत्या केली आहे. ही अभिनेत्री टेलिव्हिजन सीरिअल्स आणि सिनेमांमधील आपल्या अभिनयासाठी ओळखली जाते. 30 वर्षांच्या शोभितानं आपल्या राहत्या घरी काल रात्री उशीरा आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. अभिनेत्रीच्या निधनानंतर आता कन्नड मनोरंजन क्षेत्र आणि तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
बंगळुरूत अंत्यसंस्कार
कर्नाटकातील हसन जिल्ह्यात सकलेशपूर येथील रहिवासी असलेल्या शोभिता शिवन्नाचं (Shobitha Shivanna) लग्न झालं असून ती गेल्या दोन वर्षांपासून हैदराबादमध्ये राहत होती. मात्र, तिच्या दुःखद मृत्यूमागची कारणं अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस अधिकारी सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्राथमिक तपासात शोभितानं आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी बंगळुरूला आणलं जाणार आहे.
आत्महत्या की घातपात? पोलिसांनी काय सांगितलं?
या प्रकरणी माहिती देताना पीएस गचीबोवली पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नड अभिनेत्री शोभिता शिवन्ना अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. पं.स.गचीबोवली हद्दीत तिनं कोंडापूर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मृत महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
शोभितानं या चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं
शोभितानं बंगळुरूला गेल्यानंतर कन्नड टेलिव्हिजनमधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत ती टीव्हीवरील एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे. तिनं 12 हून अधिक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे, ज्यात गलीपाता, मंगला गोवरी, कोगिले, कृष्णा रुक्मिणी, दीपावू निनादे गलीयू निनाडे आणि अम्मावरू यांसारख्या मालिकांचा समावेश आहे. तिनं एराडोंडाला मूरू, एटीएम, ओंडू काथे हेल्वा आणि जॅकपॉट यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. शोभिताचा सर्वात अलीकडील कन्नड चित्रपट 'फर्स्ट डे फर्स्ट शो' नं चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण केला होता आणि अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आगामी चित्रपटाशी संबंधित अपडेट्स शेअर करत होती.
निधनानंतर शोभिताची शेवटची पोस्ट व्हायरल
शोभिता शिवन्नाची शेवटची पोस्ट एका गायकाची आहे जी, 'इंताहा हो गई इंतजार की' हे प्रसिद्ध हिंदी गाणं गाताना दिसतेय. लोक कमेंट करत आहेत आणि विचारत आहेत की, तिनं आत्महत्या केली हे खरं आहे का? लोक दु:खी आहेत आणि शोभिताला श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेत्रीनं कन्नड चित्रपटसृष्टीतही काम केलं आहे. 'अटेम्प्ट टू मर्डर' आणि 'जॅकपॉट' यांसारख्या चित्रपटांतून शोभिता प्रेक्षकांपर्यंत पोहोचली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :