Samadhan Sarvankar Loses in Ward 194: महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच नेत्यांची लगबग सुरू झाली. गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक नेत्यांनी प्रचाराच्या मैदानात उडी घेऊन शहर पिंजून काढलं.  संपूर्ण राज्याचं मुंबई महानगरपालिकेत कुणाची सत्ता येणार? याकडे लक्ष आहे.15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली. तर आज 16 जानेवारीला मतमोजणी प्रक्रिया पार पडली. महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे बंधुंनी युती जाहीर केली. काही ठिकाणी युतीचा फटका शिवसेनेच्या शिंदे गटालाही बसला. मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा पराभव झाला. अलिकडेच समाधान सरवणकर यांचा अभिनेत्री तेजश्री लोणारी हिच्यासोबत विवाह झाला होता. 

Continues below advertisement

शिंदे गट अन् ठाकरे बंधुंमध्ये चुरशीची लढत

ठाकरे बंधुंची युती झाल्यानंतर मुंबईत एकनाथ शिंदे आणि ठाकरे बंधुंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. दरम्यान, काही प्रभागात एकनाथ शिंदेंना ठाकरे बंधुंच्या युतीचा  जबरदस्त फटका बसला. प्रभादेवी दादर भागातील वॉर्ड क्रमांक 194मध्ये ठाकरे बंधू आणि शिवसेना शिंदे गटात टफ फाईट झाली. शिंदेंच्या शिवसेनेकडून समाधान सरवणकर आणि ठाकरेंकडून निशिकांत शिंदे यांच्यात लढत होती. दरम्यान, या लढतीत सदा सरवणकर यांच्या पुत्राचा पराभव झाला. समाधान सरवणकर यांचा पराभव होताच मुंबईतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

समाधान सरवणकर यांचं नुकतंच लग्न झालं

समाधान सरवणकर यांचा अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिच्यासोबत विवाह झाला होता. या विवाहसोहळ्यात सेलिब्रिटींसह राजकीय वर्तुळातील नेतेही उपस्थित होते. दरम्यान, लग्नानंतर समाधान सरवणकर हे महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले. दरम्यान, तेजस्विनी लोणारी हिनं देखील शिवसेनेच्या  प्रचारात सहभाग घेतला होता. तिनं प्रचाराचे काही फोटो सोशल मीडियात शेअर केले होते.  तिनं विविध भागांना भेट देऊन प्रचार केल्याचं दिसून आलं. मात्र, 194 वार्डातील जनतेनं समाधान सरवणकर यांना नाकारलं असल्याचं चित्र दिसून आलं आहे. 

शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का

दरम्यान, समाधान सरवणकर यांचा पराभव झाल्यामुळे मुंबईत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, 194 या प्रभागात शिवसेना ठाकरे गटातील निशिकांत शिंदे हे विजयी झाले आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मतदान केंद्राबाहेर कचऱ्याचा ढीग अन्...; शशांक केतकरचा संताप, VIDEOतून दाखवली International स्कूलसमोरील अवस्था