Pune Municipal Corporation Election Results: निवडणुकीच्या तोंडावर दोन राष्ट्रवादी एकत्र आणून निवडणुकीसाठी सामोरे गेलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अक्षरशः धुळदाण उडाली आहे. पुण्यामध्ये मोठा बोलबाला करूनही तसेच जोराचा प्रचार करूनही अजित पवारांच्या हाती नेमकं लागलं तरी काय हे आता आत्तापर्यंतच्या मनसुब्यातून विचारणा करण्याची वेळ आली आहे. फक्त पुण्याच्याच नाही तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मतमोजणीत भाजपने आघाडी घेत बहुमताचा आकडा गाठला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 128 जागांसाठी झालेल्या या लढतीत भाजपने 74 जागांवर आघाडी घेत सत्ता कायम राखण्याच्या दिशेने कूच केली आहे. दुसरीकडे, अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्रित राष्ट्रवादी आघाडीला केवळ ४१ जागांवर समाधान मानावे लागत असल्याचे सध्यातरी दिसत आहे. 

Continues below advertisement

भाजपने 90 जागांवर आघाडी मिळवली

तर पुणे महानगरपालिकेच्या 165 जागांसाठी आज होत असलेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने (BJP+) मोठी मुसंडी मारली आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार, भाजपने 90 जागांवर आघाडी मिळवत महापालिकेत आपली एकहाती सत्ता पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. पुणे महापालिकेत बहुमतासाठी 82 जागांची आवश्यकता आहे. 

दुसरीकडे, दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र येण्याला विरोध करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून काँग्रेस पक्षात गेलेले प्रशांत जगताप विजयी झाले आहेत. जगताप यांच्या विजयाने पुण्यात काँग्रेसनं खातं खोललं आहे. प्रशांत जगताप (Prashant Jagtap won the municipal corporation election) यांनी विजय खेचून आणला आहे, आत्तापर्यंत काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजपाच्या विरोधात प्रशांत जगताप निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.  काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेल्या शिवरकरांचा प्रशांत जगताप यांनी पराभव केला आहे. (Prashant Jagtap won the municipal corporation election)

Continues below advertisement

प्रभाग क्रमांक १८ ड मधून प्रशांत जगताप यांनी महानगरपालिका निवडणूक लढवली होती. अटीतटीच्या लढतीत प्रशांत जगताप विजयी झाले आहेत. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर हे ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपा मधे गेले होते. त्याच भाजपाच्याअभिजित शिवरकर यांचा प्रशांत जगताप यांनी पराभव केला आहे. तर दुसरीकडे प्रशांत जगताप यांची आई रत्नप्रभा जगताप या पिछाडीवरती आहेत. तर प्रशांत जगताप 1800 मतांनी विजयी झाले आहेत. (Prashant Jagtap won the municipal corporation election)

इतर महत्वाच्या बातम्या