Actor Shashank Ketkar Shares Ground Reality: निर्माता मंदार देवस्थळी प्रकरणामुळे चर्चेत असणारा अभिनेता शशांक केतकर पुन्हा एका व्हिडिओमुळे प्रकाशझोतात आला आहे. शशांक केतकर नेहमीच सामाजिक विषयांवर व्हिडिओद्वारे भाष्य करत असतो. त्यानं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केल्यानंतर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मतदाना दिवशी व्हिडिओ शेअर करत त्यानं, मतदान केंद्राबाहेरीत स्थिती दाखवली. त्यानं ठाण्यातील इंटरनॅशनल स्कूल बाहेरील अवस्था दाखवली. कचऱ्याचा ढिग दाखवत त्यानं संताप व्यक्त केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओद्वारे त्यानं जनतेचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला.
महानगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सहसा शाळांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते. शंशाक केतकर याचं नाव ठाण्यातील एका इंटरनॅशनल स्कूलमधील मतदार यादीत नाव आलं होतं. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शशांक केतकर ठाण्यातील इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेला होता. मात्र, इंटरनॅशनल शाळेबाहेरील दुरावस्था पाहून त्याचा राग अनावर झाला. त्यानं मतदान केल्यानंतर एक व्हिडिओ शूट केला. त्यानं शाळेबाहेरील कचऱ्याचा ढिगारा दाखवला. ज्या शाळेत जाऊन मतदान केलं, त्या शाळेबाहेरील अवस्था पाहा, असं म्हणत शशांकने व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये शेअर केला.
शंशाकने व्हिडिओ पोस्ट केला अन् म्हटलं की, "ज्या शाळेत जाऊन मतदान केलं आहे. त्या शाळेसमोरील थेट दृश्य पाहा. उद्या कोणताही पार्टीतला कुणीही उमेदवार निवडून आला तरी स्वच्छता या सामान्य गोष्टीसाठी कुणीही पुढाकार घेणार नाही. दरम्यान, नागरिक सुद्धा या स्वच्छतेकडे लक्ष देणार नाही, याची खात्री आहे", असं शशांक म्हणाला. "ही माझ्या उदासीनता नाही. परंतु, वस्तुस्थिती आहे. ठाण्यातील इंटरनॅशनल स्कूलसमोरीलच ही अवस्था आहे. हे अजिबात चालणार नाही", असं म्हणत त्याने संताप व्यक्त केला.
दरम्यान, व्हिडिओ शेअर करत शशांकने नेत्यांनाही टॅग केलं. शशांकचा हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी कमेंट शशांकचं कौतुक केलं. तसेच त्याच्या मताशी सहमती दर्शवली. नेटकऱ्यांनी कमेंट करून महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. दरम्यान, सकाळपासूनच बॉलिवूडपासून मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदान करण्यासाठी लोकांना आवाहन केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
अशोक सराफांच्या पत्नीचं मतदार यादीत नावच नाही; संताप व्यक्त करत निवेदिता म्हणाल्या, फोन असता तर...