Shivpratap Garudjhep : औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा डॉ. अमोल कोल्हेंचा 'शिवप्रताप गरुडझेप' (Shivpratap Garudjhep) हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये चित्रपटाविषयी आणि महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी, सध्याच्या स्थितीविषयीही चर्चा झाली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आगामी चित्रपटाच्या निमित्ताने अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली. 'शिवप्रताप गरुड झेप' या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी अमोल कोल्हे यांनी अमित शाह यांची भेट घेत, त्यांना या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगसाठी निमंत्रण देखील दिले. यावेळी दोघांमध्ये 'शिवप्रताप गरुड झेप' या चित्रपटाविषयी आणि महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी व सध्याच्या स्थितीविषयी चर्चा झाली. चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगसाठी अमोल कोल्हेंकडून अमित शाह यांना निमंत्रण देण्यात आले. तर, अमित शहांकडून या निमंत्रणाला प्राथमिक होकार देखील देण्यात आल्याचे कळते आहे.
पाहा फोटो :
या भेटीचे फोटो शेअर करत डॉ. अमोल कोल्हे यांनी एक पोस्ट देखील लिहिली आहे. यात त्यांनी लिहिले की, ‘माननीय केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांची भेट घेऊन शिवप्रताप गरूडझेप सिनेमाची माहिती दिली व दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्पेशल स्क्रीनिंगसाठी वेळ देण्याची विनंती केली. ज्या घटनेने 356 वर्षांपूर्वी देशाचे लक्ष वेधून या मातीला स्वाभिमानाची शिकवण दिली त्या घटनेवर आधारित शिवप्रताप गरूडझेप या सिनेमाने देशाचे लक्ष वेधावे व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशाच्या आणि पर्यायाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा हाच उद्देश! तसेच यानिमित्ताने शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे-नाशिक रेल्वे, शिवसंस्कार सृष्टी आणि इंद्रायणी मेडिसिटी संदर्भातही सकारात्मक चर्चा झाली. माननीय गृहमंत्री महोदयांनी बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!’
अमोल कोल्हे पुन्हा एकदा महाराजांच्या भूमिकेत
'शिवप्रताप-गरुडझेप' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा कार्तिक राजारामने सांभाळली आहे. तर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः डॉ. कोल्हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. तसेच, हा चित्रपट 'जगदंब क्रिएशन' प्रस्तुत असणार आहे. मराठी स्वाभिमानाचा अंगार...काल, आज आणि उद्याही असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा थरार आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.
हेही वाचा :