Continues below advertisement


Shivani Surve: अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, आणि यावेळी कारण आहे तिचा नवा आणि जबरदस्त लुक. तिच्या आगामी चित्रपटाचं ‘आफ्टर ओएलसीपोस्टर समोर आलं आणि सोशल मीडियावर चर्चा रंगली. नेहमीपेक्षा पूर्ण वेगळ्या भूमिकेत दिसणारी शिवानी या चित्रपटात नक्षलवादी वेशात दिसणार आहे, आणि तिचा हा डॅशिंग, बिनधास्त आणि निर्भीड अवतार प्रेक्षकांना खूप भावतोय. (Entertainment News)


शिवानी सुर्वेचा बंडखोर अवतार 


आफ्टर ओएलसी’ हा मराठीसोबत कन्नड आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे शिवानीने या भूमिकेसाठी खास तयारी केली आहे. तिने कानडी भाषा शिकण्यासाठी वर्कशॉपमध्ये सहभाग घेतला आणि संवादांवर विशेष मेहनत घेतली. ती म्हणते, “कानडी डायलॉग्स मराठीत लिहून पाठ करणं म्हणजे जणू दहावीच्या बोर्डाची तयारीच होती! पण हा शिकण्याचा अनुभव मजेशीर होता.” (Shivani Surve Look)


या भूमिकेसाठी शिवानीने आपल्या body language आणि expression वर खास लक्ष दिलं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी तिच्या या लुकसाठी विशेष मेहनत घेतली. “आजवर मी केलेल्या भूमिकांपेक्षा ही पूर्ण वेगळी आहे. थोडी बंडखोर, ताकदवान आणि प्रभावी अशी ही भूमिका माझ्यासाठी नवा अनुभव आहे,” असं शिवानी सांगते. चित्रपटात ती ‘शक्ती’ या पात्रात दिसणार असून, ती नक्षल ग्रुपची लीडर आहे. आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेणारी, आत्मविश्वासाने भरलेली ही स्त्री कमांडिंग आणि दमदार व्यक्तिमत्त्वाची आहे.


शिवानीचा नक्षल लुक प्रेक्षकांसाठी भन्नाट सरप्राईज 


आफ्टर ओएलसी’मध्ये अनेक ऍक्शन सीन्स असून, त्यासाठी ‘केजीएफ’ आणि ‘कांतारा’चे फाईट मास्टर विक्रम मोर यांनी कोरिओग्राफी केली आहे. “ऍक्शन माझ्यासाठी आव्हान होतं, पण विक्रम सरांनी संपूर्ण टीमला आत्मविश्वास दिला,” असं शिवानीने सांगितलं. हा सिनेमा दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांच्या दिग्दर्शनाखाली आणि दिपक पांडुरंग राणे, विजयकुमार शेट्टी हवाराल, रमेश कोठारी, आणि विजया प्रकाश यांच्या निर्मितीत तयार झाला आहे. ‘दिपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ प्रस्तुत हा चित्रपट 28 नोव्हेंबरला मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. शिवानीचा हा वेगळा नक्षल लुक आणि तिचा दमदार अभिनय प्रेक्षकांसाठी एक भन्नाट सरप्राईज ठरणार आहे!


हेही वाचा 


Shivangi Joshi Pahadi Look : शिवांगी जोशीचा पहाडी लूक, साधेपणातच जिंकली सगळ्यांची मने!