Solapur Crime: सोलापूर शहरात एका तरुण वकिलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (12 नोव्हेंबर) दुपारी घडली. सागर श्रीकांत मंद्रूपकर (वय 32, रा. समर्थ सोसायटी, एसआरपीएफ कॅम्प, विजापूर रोड) असे मृत वकिलाचे नाव आहे. या घटनेने सोलापूरमध्ये (Solapur Crime) मोठी खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. सागर मंद्रूपकर यांनी बुधवारी दुपारी आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावर दोरीच्या साहाय्याने स्लॅबवरील लोखंडी हुकाला गळफास घेतला. काही वेळानंतर घरच्यांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर त्यांनी त्यांना खाली उतरवून तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तेव्हाच डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Solapur Crime: चिठ्ठीत आईवर आरोप

घटनास्थळावर पोलिसांना एक आत्महत्यापत्र मिळाले आहे. त्या चिठ्ठीत सागर यांनी लिहिले आहे की, “आईकडून होणाऱ्या सततच्या दुजाभावामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला ती जबाबदार आहे. माझ्या मृत्यूनंतर तिला कठोर शिक्षा करा.” या मजकुरावरून कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Continues below advertisement

Solapur Crime: पूर्वी पोलिसांशी झालेला वाद

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अॅड. सागर मंद्रूपकर यांचा पोलिसांबरोबरही काही वाद झाला होता. हे प्रकरण सोलापूर बार असोसिएशनपर्यंत पोहोचले होते. त्या वादामुळे सागर मानसिक ताणाखाली होते का, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. पोलिसांनी या सर्व बाबींचा तपास सुरू केला असून आत्महत्येचे नेमके कारण समोर येणे बाकी आहे. तरुण वकिलाने आत्महत्या केल्याने सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Blast Update : स्फोट झालेल्या गाडीत पोलिसांना सापडला पाय; पण कोणाचा? DNA रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

Congress Satyendra Bhusari: काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत, मुंबईहून चिखलीकडे परतताना काळाचा घाला; राजकीय वर्तुळावर शोककळा