Shiv Thakare Helping People During Taxi Strike: राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी (Taxi Strike) मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. परवाना मिळवण्यासाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचं आहे, असा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक मराठी माणसाने राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. दरम्यान, अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला. याच निर्णयाचा विरोध दर्शवण्यासाठी विविध चालक संघटनांनी संपावर जाण्याचा इशारा दिला. 4 मे पासून हा संप सुरू होणार, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, मराठी सक्तीच्या या निर्णयाला सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी (Entertainment) पाठिंबा दर्शवला. अभिनेता शिव ठाकरेनेही (Shiv Thakare) पाठिंबा दर्शवला असून, तो सामान्यांच्या मदतीसाठी मैदानात  उतरला आहे. त्यानं पोस्ट शेअर नेमकी कोणती मदत करणार याची माहिती दिली.  सध्या त्यानं  शेअर केलेल्या पोस्टचं विशेष कौतुक होत आहे. 

Continues below advertisement

अभिनेता शिव ठाकरेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. 4 मे पासून संप सुरू होणार आहे, त्यामुळे त्याची गाडी जिथे कुठे दिसेल, तिथे हक्काने थांबवावी, असे आवाहन शिव ठाकरेने आपल्या पोस्टद्वारे केले आहे. यावेळी त्यानं आपल्या पोस्टमधून गाडीचा नंबर आणि गाडीचे नाव शेअर केले आहे. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे त्यानं केलेल्या मदतीचं विशेष कौतुक होत आहे. 

शिव ठाकरेकडून मदतीचा हात (Shiv Thakare free ride announcement Instagram viral post)

शिव ठाकरेने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की,  'रामराम महाराष्ट्र, 4 मे रोजी टॅक्सी ड्रायव्हर या लोकांचा संप आहे.  तरीही कुठेही MH 27 DK 0909 (TATA Harrier) ही तुमच्या हक्काची गाडी दिसली, तर तुम्ही थांबवू शकता.   आपली निशाणी एकच, गाडीच्या पाठीमागे जय महाराष्ट्र लिहिलेलं असेल.   तसेच ड्रायव्हर सीटवर भगवा फेटा घातलेला दादा असेल, जो आपल्या सेवेस तत्पर असेल'.

Continues below advertisement

'काहीपण हो..  मराठी माणूस थांबता कामा नये. तुमचा आपला माणूस शिव ठाकरे', असं शिव ठाकरेने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यानं इंग्रजी भाषेतही आपली पोस्ट शेअर केली आहे. सध्या शिव ठाकरेची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असून,  शिव ठाकरेने आपल्या मराठी माणसासाठी केलेलं आवाहन कौतुकास्पद  आहे, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'Michael'च्या तालावर बॉक्स ऑफिस थिरकला; पहिल्या दिवशी तोडले रेकॉर्ड्स; भारतातही बायोपिकला पसंती