Michael Jackson Biopic Box Office Collection Worldwide: मायकल जॅक्सन (Michael Jackson) यांच्या जीवनावर आधारीत 'मायकल' हा बायोपिक (Biopic) बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 82 मिलियन डॉलर बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं.  आता फिल्ममेकर्सची अशी अपेक्षा आहे, पहिल्या विकेंडमध्ये हा सिनेमा 200 मिलियन डॉलरपेक्षा  अधिक कमाई करेल.  सध्या या चित्रपटाची क्रेझ संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे.  

Continues below advertisement

बॉक्स ऑफिस मोजोच्या रिपोर्ट्सनुसार,  नॉर्थ अमिरिकेत 'मायकल'  या बायोपिक सिनेमाने  39  मिलियन डॉलरची कमाई केली. आतापर्यंत रिलीज झालेल्या कोणत्याही बायोपिकसाठी ही सर्वाधिक ओपनिंग ठरली आहे. मुख्य म्हणजे 'मायकल' या सिनेमाने बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्समध्ये बहुचर्चित 'ओपेनहायमर' या सिनेमालाही मागे टाकलं. माहितीनुसार, 'ओपेनहायमर' या सिनेमाने 33 मिलियन डॉलरची ओपनिंग केली होती.

'मायकल'चा जगभरात धुमाकूळ (Michael movie opening day earnings)

 

Continues below advertisement

ओव्हरसीज मार्केटमध्ये या सिनेमाने  30 मिलियन डॉलरची कमाई केली.  तसेच या सिनेमाने गुरुवारच्या पेड प्रिव्ह्यूमध्ये 13  मिलियन डॉलरची कमाई केली होती. जागतिक बॉक्स ऑफिसवर ही आतापर्यंतची सर्वोत्तम ओपनिंग ठरली आहे. 'मायकल' या सिनेमाने 'ओपेनहायमर आणि 'Bohemian Rhapsody' या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला मागे टाकले. 

डेडलाइनच्या  मते, नॉर्थ अमेरिकेत विकेंडला हा सिनेमा 90 - 95 मिलियन डॉलरची बॉक्स ऑफिस कमाई करु शकते.   जर या सिनेमाने इतक्या डॉलरची कमाई केली तर,  'ओपेनहायमर' आणि 'Straight Outta Compton' या सिनेमांचं बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स मोडीत काढू शकते.   'ओपेनहायमर' या चित्रपटाने 82 मिलियन डॉलरची कमाई केली होती तर, 'Straight Outta Compton' या सिनेमाने 61 मिलियन डॉलरची कमाई केली होती.  तर, भारतात 'मायकल' या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. पेड  प्रिव्ह्यूजमध्ये या सिनेमाने 1.70 कोटींची कमाई केली. तर, पहिल्या दिवशी 3.80 कोटी,  दुसऱ्या दिवशी 5.10 कोटी आणि तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 5.50 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. भारतातही मायकल जॅकसनचे चाहते असून, या सिनेमाला पसंती मिळत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

फुलांसह होळी अन् देवाची पुजा, अंबानींच्या घरी लंचला पोहोचली Popstar रिहाना, राधिकानं गायिकेला दिलं खास गिफ्ट