Shani Sade Sati : ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला (Shani Dev)कर्मफळदाता म्हणतात. तसेच, सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. त्यामुळेच ज्या राशींवर शनिची ढैय्या आणि साडेसाती असते त्यांच्यावर होणारा परिणाम दिर्घकाळ असतो. शनि एका राशीत जवळपास अडीच वर्ष स्थित असतात. शनिची साडेसाती जेव्हा राशींवर पडते तेव्हा त्याची विभागणी तीन टप्प्यात केली जाते. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा म्हणजेच अंतिम टप्पा.
अनेकदा शनिच्या साडेसातीबद्दल लोकांच्या मनात भीती असते. याचं कारण म्हणजे, साजेसातीच्या काळात आपल्या आयुष्यात अनेक बदल घडतात. जास्त काम करावं लागतं. जबाबदाऱ्या वाढतात तसेच, अनेकदा आपल्या मनाविरुद्ध गोष्टींचा सामना करावा लागतो. मात्र, हा फक्त वाईटच काळ नसतो. तर, यामुळे अनेक राशींच्या जीवनात सकारात्मक बदल देखील दिसून येतात.
सध्या शनि मीन राशीत स्थित आहेत. अशात मीन, मेष आणि कुंभ राशींच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा परिणाम सुरु आहे.
मेष रास - साडेसातीचा पहिला टप्पा
मेष राशीच्या लोकांची 29 मार्च 2025 पासून साडेसाती सुरु झाली आहे. मेष राशीत साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. या दरम्यान तुमच्या आयुष्यात अनेक बदल घडतील. तसेच, कामाचा ताणदेखील वाढेल. काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील.
मेष राशीच्या लोकांची 31 मे 2032 रोजी साडेसातीपासून सुटका होईल. त्यामुळे कोणतेही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. धैर्याने काम करा.
कुंभ रास - शनिच्या साडेसातीचा अंतिम टप्पा
कुंभ राशीच्या लोकांच्या स्थितीत हळुहळू सुधारणा होत चालली आहे. या राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. त्यामुळे तुम्हाला या कालाधीत कमी अडचणींना सामोरं जावं लागेल.
कुंभ राशीच्या लोकांवर 3 जून 2027 रोजी शनिची साडेसाती संपेल. म्हणजेच हा काळ लवकरच जवळ येणार आहे.
मीन रास - शनिच्या साडेसातीचा दुसरा टप्पा
मीन राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा पुरेपूर फरक पडणार आहे. या राशीवर 3 जून 2027 पासून शनिची साडेसाती सुरु होणार आहे. त्यामुळे मीन राशीसाठी हा काळ काहीसा कठीण असणार आहे. या दरम्यान तुम्हाला तुमच्या करिअर आणि आरोग्याच्या बाबतीत तसेच,आर्थिक स्थितीच्या बाबतीत अनेक चढ-उतार पाहायला मिळतील.
मीन राशीच्या लोकांची 8 ऑगस्ट 2029 नंतर साडेसाती संपणार आहे.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
