Dindori Lok Sabha Election Result 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांचा 1 लाख 13 हजार 199 मतांनी पराभव केला. मात्र दिंडोरीच्या मतमोजणी दरम्यान भास्कर भगरे यांच्या नावात साम्य असलेले उमेदवार बाबू सदू भगरे (Babu Bhagare) यांची जोरदार चर्चा रंगली. कारण बाबू सदू भगरे यांनी तब्बल 1 लाख 03 हजार 632 मतं मिळवली.
दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे पेशाने सर आहेत. तर बाबू भगरे यांच्या नावापुढे सर असे लावण्यात आल्याने अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आता दिंडोरीतील अपक्ष उमेदवार बाबू भगरे हे अचानक गायब झाल्याचे समजते. भास्कर भगरे आणि बाबू भगरे यांचे चिन्हात देखील साधर्म्य असल्याचे दिसून आले. भास्कर भगरे यांचे तुतारी वाजविणारा माणूस तर बाबू भगरे यांचे तुतारी असे चिन्ह होते.
दिंडोरीतून एक लाख मतं मिळवणारे बाबू भगरे नेमके कोण?
बाबू भगरे हे तिसरी पास असल्याची माहिती मिळत आहे. नाशिकमधील एकलहरे येथील ते रहिवासी आहेत. बाबू भगरे हे मोलमजुरी आणि मासेमारी करतात. तरीही नावापुढे सर म्हणून उल्लेख होता. बाबू भगरे यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. मात्र लाखभर मतं मिळाल्याने बाबू भगरे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून बाबू भगरे निवडणुकीला उभे होते याबाबत त्यांच्या शेजाऱ्यांना देखील माहिती नसल्याचे समोर येत आहे.
विधानसभा निहाय झालेले मतदान
नांदगाव विधानसभा (सुहास कांदे- शिंदे गट)
- भास्कर भगरे - 61336
- डॉ.भारती पवार- 103001*
- बाबु सदू भगरे सर - 12288
कळवण विधानसभा (नितीन पवार - अजित पवार गट)
- भास्कर भगरे -114134*
- डॉ.भारती पवार-56461
- बाबु सदू भगरे सर- 20843
चांदवड विधानसभा ( राहुल आहेर- भाजप)
- भास्कर भगरे -78578
- डॉ.भारती पवार-95325*
- बाबु सदू भगरे सर- 12509
येवला विधानसभा (छगन भुजबळ- अजित पवार गट)
- भास्कर भगरे -93500*
- डॉ. भारती पवार-80295
- बाबु सदू भगरे सर-16039
निफाड विधानसभा (दिलीप बनकर अजित पवार गट)
- भास्कर भगरे - 89554*
- डॉ.भारती पवार- 71370
- बाबु सदू भगरे सर-14414
पेठ-दिंडोरी विधानसभा.( नरहरी झिरवाळ- अजित पवार गट)
- भास्कर भगरे- 138189*
- डॉ. भारती पवार - 55881
- बाबु सदू भगरे सर-27442
एकूण झालेले मतदान - 1241985
- ग्राह्य मतदान - 1232664
- बाद मतदान- 1075
- नोटा - 8246
एकूण पोस्टल मतदान- 5310
ग्राह्य मतदान- 4195*
बाद मते- 1075
भास्कर भगरे - 2048
डॉ. भारती पवार- 1807
बाबु सदू भगरे सर- 106
लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?
देशपातळीवरील समीकरणं
एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17
महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी- 29
महायुती- 18
अपक्ष- 1
महायुतीमधील पक्षीय बलाबल
भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1
महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?
काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8
आणखी वाचा